संपादकीय : महाराष्ट्राचे गतिमान नेतृत्व : मा.श्री.अजितदादा पवारसाहेब | Ajitdata Pawar Biography in Marathi


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे. अजितदादा पवार हे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा संगम असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
        
 मा.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या तत्पर व धडाडीच्या कार्यशैलीने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. दादांच्या कामाचा प्रचंड उरक, धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता, झोकून देऊन काम मार्गी लावण्याची सवय, अभ्यासूपणा, कमालीची शिस्त, वक्तशीरपणा, कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळणारे, दूरदर्शी, कठोर प्रशासक, स्पष्टवक्तेपणा अशा कितीतरी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. कोणत्याही कामामध्ये गुणवत्ता, उत्कृष्टपणा, परिपूर्णता यांना दादा नेहमीच प्राधान्य देत आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये दादांनी कृषी, फलोत्पादन, ग्रामविकास, पाटबंधारे, जलसंपदा, ऊर्जा, अर्थ व नियोजन इ.खाती सांभाळताना प्रत्येक खात्यावर आपला ठसा उमटविला आहे. सर्वसामान्य माणसांना केंद्रीभूत मानून त्यांनी गतिमान प्रशासनाला चालना दिली आहे. मंत्रालयात असो किंवा राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात भेटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नागरिकाला अजितदादांनी एकदा शब्द दिला की संबंधित नागरिक किंवा कार्यकर्ता हा निर्धास्त राहतो. कारण त्याला विश्वास असतो की हा अजितदादांचा शब्द आहे, यात कोणताही बदल होणार नाही आणि आपलं काम हे शंभर टक्के होईल.
           
राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्येही दादांनी भरीव योगदान दिले आहे. स्व.बाबूरावजी घोलपसाहेब यांनी लावलेल्या 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या उद्दिष्टानुसार कार्यरत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रोपट्याचे आज मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे. दरवर्षी संस्थेच्या शाखांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम आहे. कबड्डी, कुस्ती, खो-खो सारख्या देशी क्रीडा प्रकारांना व क्रीडाखेळाडूंना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे दादांनी काम केलेले आहे. महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले पाहिजेत, अशी दादांची नेहमी तळमळ असते.
           
आज वाढदिवसानिमित्त मा.अजितदादांना माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा! त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

आपलाच,
प्रा.केतन भिमसेन डुंबरे
ग्रंथपाल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बु.,पुणे.
कार्यकारी संपादक, आम्ही जुन्नरकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad