आमच्याबद्दल


संचालक मंडळ
श्री.हर्षल एकनाथ भगत
संस्थापक, मुख्य संपादक
Software Engineer at Accenture Inc.
सौ.दिव्या हर्षल भगत
संचालक
B.Com & Tally ERP9 Certified

नमस्कार...

आईसाहेब जिजाऊंच्या संस्कारांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा साथीदार म्हणजे आपला महाराष्ट्र... शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे आपला महाराष्ट्र... इतिहासाचा साक्षात्कार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे आपला महाराष्ट्र.... कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिन दलित दुबळ्यांचा, १०५ हुतात्म्यांचा बलिदानाचा आणि दिल्लीच्याही तक्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा आपला महाराष्ट्र...

संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, वारकऱ्यांच्या भक्तीचा, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, त्यांचं निसर्गसंप्पन्न वैभव आणि त्यांच्या ऐतेहासिक पराक्रमाचा वारसदार म्हणजे आपला महाराष्ट्र. अशा या भारतातील सर्वात श्रीमंत आणि आघाडीच्या महाराष्ट्र राज्यातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून परिचित असलेल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील उच्चशिक्षित पुत्राने आम्हीजुन्नरकर.com वेबसाईटची निर्मिती केली.

महाराष्ट्रातील सर्वात पहिला पर्यटन तालुका शिवजन्मभूमी जुन्नरचा निसर्गसंपन्न परिसर, ऐतिहासिक इतिहास, येथील पर्यटन स्थळे, खाद्यसंस्कृती तसेच महाराष्ट्रातील विविधता, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, महाराष्ट्राची वारकरी परंपरा, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, महाराष्ट्राचे सण या बाबतची माहिती आपल्या रसिक वाचकांना आपला अभिमान असणाऱ्या मराठी भाषेत उपलब्ध करून देणे हाच एक आम्हीजुन्नरकर.com वेबसाईटची निर्मिती करण्यामागे आमचा प्रामाणिक हेतू होता.

आपल्या मराठी मातृभाषेत असणाऱ्या खूपच कमी वेबसाईट सध्या गूगल वर कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती देणे एवढाच हेतू मनात न ठेवता त्याबरोबरच आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण असणाऱ्या जागतिक घडामोडी, आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक, बाजरात नवीन येणाऱ्या टेक्नोलॉजी - गॅजेट चे अपडेट्स, आपल्याला वाचनासाठी तसेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी प्रेरित करणारे विविध मान्यवरांचे लेख, कविता आपल्या मराठी मातृभाषेत आपल्या रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

अश्या या चांगल्या उपक्रमास विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित युवकांनी साथ दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.

धन्यवाद.

आपलाच,

श्री.हर्षल एकनाथ भगत : संस्थापक, मुख्य संपादक