विशेष लेख : आपल्या रेशन कार्ड बद्दल हि माहिती आहे का तुम्हाला ? | Ration Card in Marathi

 भारत सरकार व महाराष्ट्र शासन जनहितार्थ माहिती 



प्रिय ग्राहक,
       भारत सरकार देशातील सर्व गावांत प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला स्वस्त धान्य पुरवठा करते. संबंधित राज्य सरकाराचे अन्न व नागरी पुरवठा विभाग त्या स्वत धान्याचे वितरण करते. वेगवेगळ्या शिधापत्रिका(रेशन कार्ड) धारकांना हा पुरवठा त्याप्रमाणे केला जातो. खाली उदाहरणादाखल काही नमुना दर दिले आहेत.


Targeted Public Distribution System - Retail Price per k.g.

धान्य नाव     AAY(केशरी कार्ड)         BPL(पिवळे कार्ड)
                            (प्रति किलो)
तांदूळ                       रु.३.००                           --                        
गहू                            रु.२.००                            --                        
इतर धान्य                 रु.१.००                            --                
साखर                       रु.२०.००                           --

या दराप्रमाणे एखाद्याने १६ किलो गहू व १२ किलो तांदूळ घेतल्यास रेशन धान्य घेतल्यास

गहू      १६ x २रु. = ३२रु.
तांदूळ १२ x ३रु. = ३६रु.
----------------------------------
एकूण               =  रु.६८.००

रेशन दुकानदारास आपण पैसे देताना ६८ रुपयेच द्यावेत.

बऱ्याच वेळा आपण ४८ रुप्याचे धान्य घेतल्यास ५० रुपये देतो किंवा ६८ रुपयांचे धान्य घेतल्यास ७० रुपये देतो पण धान्य दुकानदार उरलेले पैसे जाणूनबुजून पुन्हा देत नाही. २ रु. म्हणून आपण जाऊन देतो पण हेच पैसे या दुकानदाराच्या खिशात जातात. जनतेच्या अज्ञानाचा वा अजाणतेपणाचा गैरफायदा घेतला जातो. अनेक गावातील अनुभव हा असाच आहे. यातील बरेचसे दुकानदार लोक पैशाने श्रीमंत असतातच आणि बहुतेक जण तर अशा विविध मार्गांनी आपल्यासारख्या आम जनतेचे पैसे खाऊनच मोठे झालेले असतात. बक्कळ पैसे असूनही यांची २-२ रुपये खाण्याची प्रवूत्ती जात नाही.

हे पैसे आपण न मागता त्यांनी द्यायला हवेत. पण तरीही एखादा दुकानदार देत नसेल तर मागून घ्या. यासाठी ग्राहकांनी सतर्क असणे गरजेचे आहे. रेशन सर्वांनाच मिळते पण अनेक घरातील तरूण व शिक्षित  मुली मुले ते आणायला जायला लाजतात. त्यामुळे घराघरात बुजुर्ग मंडळी वा अशिक्षित मंडळी यांना ते राशन आणायला जावे लागते. त्यांना यातलं फार काही समजत नाही. आणि याचाच गैरफायदा घेत संबंधित दुकानदाराला त्याचा हेतू साध्य करता येतो. मग कुठे तरी वजनकाटाच मारणे, उरलेले पैसेच न देणे असे प्रकार घडतात. घरातील तरुण व शिक्षित मुला-मुलींनी या गोष्टी लक्षात घेत जा.

जागो ग्राहक जागो 💪🤝

धान्य घेतले तरच ठसे द्या

अशा पद्धतीने अनेक गावांमध्ये खालील बाबही निदर्शनास आली आहे.
समाज, काही कारणास्तव एखाद्या महिन्यात कुटुंबाला राशन भरता आले नाही, तर दुकानदार लोकांच्या घरी जाऊन घरातील एखाद्या वयस्कर अथवा अनपढ माणसाच्या बोटांचे ठसे घेऊन जातात, अशा वेळी कारण सांगतात की जर ठसे दिले नाही तर पुढच्या महिन्यात तुमचे धान्य येणार नाही. परंतु हे असे नसते. तुम्ही एखाद्या महिन्यात धान्य भरले नाही याचा अर्थ असा की पुढच्या महिन्यात तुमचे धान्य सरकार पाठवणार नाही कारण या महिन्यातला तुमच्या वाट्याचा साठा शिल्लक आहे. पण हे दुकानदार लोकं खोटे सांगून ठसे नेतात व तुमचे त्या महिन्याचे शिल्लक धान्य काळ्याबाजाराने वेगवेगळ्या ठिकाणी जास्त किमतीत विकतात. याचा अर्थ तुम्ही धान्य न घेता ठसे दिले, परिणामी सरकारला ठसा मिळाल्याचे रेकॉर्ड गेल्यामुळे पुढच्या महिन्यात सरकार आपला साठा पाठवतेच. म्हणजे तुमचे आधीच्या महिन्यातले धान्य काळ्याबाजाराने गायब. त्यामुळे तुम्ही धान्य घेतले तरच ठसे द्या अन्यथा नाही. जनतेचे राशन कायम राहण्यासाठी स्वतःचा वेळ व पैसे खर्च करून कोणताही दुकानदार ठसे घेत फिरत नाही. हे फक्त तुमचे रेशन काळ्याबाजाराने बाहेर विकता यावे म्हणून तुमचे ठसे घरी घ्यायला येतात. असे ठसे घ्यायला जर घरी आले तर त्याला सरळ सांगा ठसे घ्यायला घरी येतो तसे येताना बरोबर आमचे रेशन पण आणत जा. संबंधित दुकानदार जर तुम्हाला असं सांगत असेल की तुम्ही ठसे न दिल्यास तुमचे पुढील महिन्यातील धान्य येणार नाही तर ते साफ चुकीचे आहे. आणि त्याला तुमचे धान्य लगेच बंद करण्याचा असा कोणताही वैयक्तिक अधिकार दिलेला नाही. तो तसे करूच शकत नाही. तसे झाल्यास त्याची तक्रार करता येते.
लक्षात ठेवा, बोटांचे ठसे देणे ही पद्धती काळाबाजार कमी करण्यासाठी आणली आहे.

मंडळी धान्याप्रमाणेच खते वा इतर बाबी यासंबंधी अनेक काळाबाजार व अवैध व्यवहार गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकासअधिकारी व ग्रामपंचायत तसेच गावातील सतर्क नागरिकांनी व विशेषतः तरुणांनी रोखायला हवेत. अन्यथा अनेक गावात हे लोक गावातील राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून असला काळाबाजार करतच राहतील. शहरांमध्येही हे असले प्रकार काही प्रमाणात चालू असतात.

जागो ग्राहक जागो 💪🤝

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन पाहण्यासाठी 👇


रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा? 👇🏻



धन्यवाद. 

साभार :- माहिती तंत्रज्ञान (IT) अभियंता , पुणे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad