अष्टविनायक : श्री गिरिजात्मक गणपती तिर्थक्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर जि. पुणे | Ashtavinayank Girijatmak Ganpati in Marathi


!! श्री गिरिजात्मक गणपती प्रसन्न !!

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट आणि ‘विनायक या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे.अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत.

स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ||               बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम || लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |

या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा.

शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-

  • पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
  • दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
  • तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
  • चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
  • पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
  • सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
  • सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
  • आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

 अशा या अष्टविनायक यात्रेतील सहाव्या लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मक गणपती ची माहिती आपण बघूया.

सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक 



अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. येथे ज्या गुहेत पार्वती मातेला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली.श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे.गिरीजा म्हणजे पार्वती, मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज.असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. एकूण २८ लेण्या आहेत,पैकी मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात.

मंदिर आणि परिसर : 

मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे.श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत.मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे.देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले आहे,त्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही.मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.

इथे मुख्य सभा मंडप असून त्याला १८ लहान खोल्या आहेत .भाविक इथे बसून ध्यान करू शकतात.

मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्व विभागाकडून परवानगी आणि सशुल्क पास उपलब्ध होतो.

स्थान : तिर्थक्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर जि. पुणे

जवळची ठिकाणे :

  • माळशेज घाट : थंड हवेचे ठिकाण व अभयारण्य.
  • ऐतिहासिक नाणेघाट.
  • शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.
  • कुकडेश्वर मंदिर.

अंतर :

  • पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री १२० कि.मी.
  • मुंबई – कल्याण – जुन्नर – लेण्याद्री १८० कि.मी.
  • नाशिक – आळेफाटा – ओतूर -लेण्याद्री १५० कि.मी.

अधिक माहिती साठी श्री गिरिजात्मक गणपती देवस्थान ट्रस्ट च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. 
http://www.lenyadriganpati.com/mr

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.

भक्तनिवास बुकिंग, दर्शनाची वेळ  तसेच मंदिराविषयी अधिक माहिती साठी खालील वेबसाईट ला भेट द्या.
https://www.ashtavinayak.in/lenyadri-girijatmaj-ganpati-ashtavinayak.php

श्री गिरिजात्मक गणपती देवस्थान, लेण्याद्री ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे. जुन्नर वरून जीप ने लेण्याद्री  ला पोहोचावे.

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण, पुणे, नाशिक

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ


धन्यवाद. 

माहिती संकलन : श्री.प्रविण गोविंद दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad