अष्टविनायक : श्री विघ्नहर गणपती तिर्थक्षेत्र ओझर ता. जुन्नर जि. पुणे | Ashtavinayak Vighneshwar Ganpati in Marathi


!! श्री विघ्नहर गणपती प्रसन्न !!

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट आणि ‘विनायक या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे.अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत.

स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ||               बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम || लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |

या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा.

शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-

  • पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
  • दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
  • तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
  • चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
  • पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
  • सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
  • सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
  • आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

 अशा या अष्टविनायक यात्रेतील सातव्या ओझरच्या श्री विघ्नेश्वर गणपती ची माहिती आपण बघूया.

सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर : 


अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते.हे मंदिर लेण्याद्रीपासून २० किमी अंतरावर आहे. असे म्हणतात सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली.येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात.

मंदिर आणि परिसर :

मंदिराला दगडी तटबंदी असून मंदिर पूर्वाभिमुख आहे.मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर उंच दीपमाला नजरेस पडतात. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत.दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे.रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत.

कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे.

स्थान : तिर्थक्षेत्र ओझर ता. जुन्नर जि. पुणे

जवळची ठिकाणे :

  • खोडद : आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश दुर्बीण
  • भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग.
  • शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.
  • आळे: संत ज्ञानेश्वर यांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले त्या रेड्याची समाधी येथे आहे.
अंतर :
  • पुणे -नारायणगाव – ओझर :९०km
  • नाशिक-आळेफाटा -ओतूर -ओझर : १४५km
  • कल्याण -ओतूर-ओझर : १२५ km

अधिक माहिती साठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. 
http://www.shrivighnaharganpatiozar.org

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.


श्री विघ्नहर गणपती देवस्थान, ओझर ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर किंवा ओतूर ला उतरावे , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (ओतूर - नारायणगाव - ओतूर) एसटी बस ची सोय आहे.  जुन्नर - ओझर एसटी ने ओझर ला पोहोचावे.

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ



धन्यवाद. 

माहिती संकलन : श्री.प्रविण गोविंद दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad