मराठी संस्कृती : मराठी सण : वटपौर्णिमा | Vatpornima in Marathi

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.



या सणामागे कथा अशी की सावित्री या स्त्रीने आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी, यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने प्रसन्न केले आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. ज्या वृक्षाखाली सत्यवानचा जीव परत आला ते झाड वडाचे होते.

त्यामुळे सावित्रीने वडाची मनापासून पूजा केली. याच प्रसंगाची आठवण म्हणून बायका वडाच्या वृक्षाची पूजा करतात. या दिवशी स्त्रिया व्रत करतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या पतिला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करतात. आणि वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.
             
अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती मला मिळू दे. मला व माझ्या पतीला आरोग्यगायी दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले यांनी माझा प्रपंच संपन्न असू दे, अशी प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी |
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात् ||
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन ।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ||

अशी प्रार्थना करतात.

धन्यवाद.

माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad