विशेष लेख : कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व | Importance of Ganesh Pujan in Marathi




|| गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या
|| अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत.
|| गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची
|| आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते म्हणून
|| कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा
|| करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात.

|| गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने
|| त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात.
|| गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत
|| रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात

|| श्री गणेश हे सर्व संतांनी गौरविलेले आराध्यदैवत आहे.
|| निरनिराळ्या साधना मार्गांतील संत वेगवेगळ्या देवतांचे
|| भक्‍त असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी
|| आणि त्याचे स्तवन आवर्जून केले आहे. मराठी
|| संतवाङ्मयातून तर श्री गणेशाचे लौकिक आणि
|| पारलौकिक स्वरूपाचे वर्णन मोठ्या सुबकरित्या केलेले
|| आढळते.

-:♦ डाव्या सोंडेचा गणपति अध्यात्माला पूरक असणे ♦:-

|| पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. ‘उजव्या
|| सोंडेचा गणपति हा अतिशय शक्‍तीशाली आणि जागृत
|| आहे’, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपति
|| असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे
|| पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात.

|| आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील
|| नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत नसल्याने
|| पूजाविधीमध्ये चुका होतात आणि त्याचा आपल्याला
|| त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पूजेत शक्यतो
|| उजव्या सोंडेचा गणपति ठेवू नये. याउलट डाव्या सोंडेचा
|| गणपति तारक स्वरूपाचा आणि अध्यात्माला पूरक
|| असतो. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

-:♦ श्री गणेशाच्या पूजेत :------------
-:♦ तांबड्या रंगांच्या वस्तू असण्याचे कारण :------------

|| देवतेची पवित्रके म्हणजे देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म कण.
|| ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित
|| करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते, अशा
|| वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच त्या देवतेचे तत्त्व
|| मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ
|| आपल्याला लवकर होतो.

|| या तत्त्वानुसार श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या
|| वस्तूंचा उपयोग करावा. तांबड्या रंगात गणेशतत्त्व आकृष्ट
|| करण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे मूर्ती अल्पावधीत
|| जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठीच श्री गणेशाच्या
|| पूजेत रक्‍तचंदन वापरतात.

-:♦ श्री गणेशाला गंध, हळद-कुंकू वहाण्याची पद्धत :-----

|| पूजा करतांना श्री गणेशाला उजव्या हाताच्या
|| करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध
|| लावावे. श्री गणेशाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद
|| अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका
|| यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे. अंगठा आणि
|| अनामिका जोडून निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या
|| देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्‍तीभाव
|| निर्माण होण्यास साहाय्य होते.

-:♦ श्री गणेशाला लाल फुले वहाण्याचे महत्त्व आणि प्रमाण

|| विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची
|| क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते श्री गणेशाला
|| तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. या फुलांकडे
|| गणेशतत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या
|| तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

-:♦ श्री गणेशाला लाल फुल वहातांना :------------

|| देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट
|| आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर
|| आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्री गणेशाला फुले वहातांना
|| ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात
|| वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वहातांना ‘दोन
|| लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि
|| मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील’, अशा पद्धतीने
|| फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहतांना ‘देठ
|| श्री गणेशाच्या चरणांकडे व तुरा आपल्याकडे येईल’,
|| असे वाहावे.

-:♦ श्री गणेशाला दूर्वा वहाण्याचे कारण आणि पद्धत ♦:-

-:♦ श्री गणेशाला दूर्वा वहातांना :------------

|| दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता
|| अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दूर्वा
|| वहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि
|| देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो.

|| श्री गणेशालादूर्वा नेहमी विषम संख्येने { न्यूनतम ३ किंवा
|| ५, ७, २१ इत्यादी } वाहाव्यात. श्री गणेशाला वहायच्या
|| दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा
|| विषम संख्येच्या पात्या असाव्यात. समिधा एकत्र बांधतो,
|| तशा दूर्वा एकत्र बांधाव्यात. एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध
|| बराच काळ टिकतो. या गंधामुळे गणेशतत्त्व मूर्तीकडे
|| अधिक प्रमाणात आकृष्ट होते आणि टिकूनही रहाते.
|| यासाठी दूर्वा अधिक वेळ टवटवीत रहाव्यात; म्हणून
|| पाण्यात भिजवून मग वहाव्यात. दूर्वा वहातांना पात्यांचा
|| भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या
|| मूर्तीकडे असावा. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे
|| प्रक्षेपित व्हायला साहाय्य होते.

-:♦ श्री गणेशाच्या तारक आणि मारक :------------
-:♦ तत्त्वाप्रमाणे वापरायच्या उदबत्ती :------------

|| श्री गणेशाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक
|| प्रमाणात आकृष्ट करण्याकरता चंदन, केवडा, चमेली
|| आणि वाळा यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या
|| वापराव्यात. श्री गणेशाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात
|| आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधांच्या
|| उदबत्त्या वापराव्यात. भक्‍तीच्या आरंभीच्या टप्प्यात,
|| म्हणजे द्वैतात असतांना देवतेला दोन उदबत्त्यांनी
|| ओवाळणे अधिक योग्य आहे. उपासकाने भक्‍तीच्या
|| पुढच्या टप्प्यात, अद्वैताकडे जाण्यासाठी एका उदबत्तीने
|| ओवाळावे. देवतेला उदबत्तीने ओवाळतांना उदबत्ती
|| उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्या जवळील बोट
|| आणि अंगठा यांत धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने
|| तीन वेळा ओवाळावे.

-:♦ श्री गणेशाला प्रदक्षिणा घालणे :------------

|| श्री गणेशाचे दर्शन घेतल्यावर त्याला न्यूनतम ८ प्रदक्षिणा
|| घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून
|| मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त
|| घालायच्या असल्यास त्या शक्यतो ८ च्या पटीत
|| घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवतेकडून प्रक्षेपित
|| होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते

-:♦ श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती

|| श्री गणेशाला गंध कोणत्या बोटाने लावावे ? अनामिकेने
|| { करंगळीच्या जवळचे बोट } फुले कोणती वाहावीत ?
|| लाल जास्वंद/ लाल रंगाची अन्य फुलेकोणत्या गंधाच्या
|| उदबत्तीने ओवाळावे ? चंदन / केवडा / चमेलीउदबत्त्यांची
|| संख्या किती असावीदोनअत्तर कोणत्या गंधाचे अर्पण
|| करावे ? हीनाश्री गणेशाला प्रदक्षिणा किती घालाव्यात ?
|| आठ किंवा आठच्या पटीत

--- -:♦ श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ ♦:- ---

१ } संपूर्ण मूर्ती

|| ओंकार, निर्गुण.

१ } { अ } सोंड

१ } { अ १ } उजवी सोंड

|| उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी
|| मूर्ती दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू
|| दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू
|| सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ
|| शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू
|| असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या
|| सोंडेचा गणपति जागृत आहे, असे म्हटले जाते.

|| दक्षिणाभिमुखी मूर्तीची पूजा नेहमीसारखी केली जात
|| नाही; कारण दक्षिणेकडून तिर्यक { रज-तम } लहरी
|| येतात. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व
|| नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे
|| सात्त्विकता वाढते आणि दक्षिणेकडून येणार्‍या रज-तम
|| लहरींचा त्रास होत नाही.

१ } { अ २ } डावी सोंड

|| डाव्या सोंडेचा गणपति म्हणजे वाममुखी गणपति. वाम
|| म्हणजे डावी बाजू किंवा उत्तर दिशा. डाव्या बाजूला
|| चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा
|| अध्यात्माला पूरक आहे, आनंददायी आहे; म्हणून बहुधा
|| वाममुखी गणपति पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या
|| पद्धतीने केली जाते.

१ } { आ } मोदक

१ } 'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहानसा भाग
|| मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. मोदकाचा
|| आकार नारळासारखा म्हणजे 'ख' या ब्रह्मरंध्रातील
|| पोकळीसारखा असतो. कुंडलिनी 'ख' पर्यंत पोहोचल्यावर
|| आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे
|| आनंद प्रदान करणारी शक्ती.

२ } 'मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे; म्हणून त्याला
|| ‘ज्ञानमोदक' असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे
|| वाटते { मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे } पण अभ्यास
|| करू लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे.
|| { मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे. } मोदक
|| गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.'

३ } मोदकाचा आकार नारळासारखा असतो. नारळाचे एक
|| वैशिष्ट्य, म्हणजे तो त्रासदायक स्पंदने स्वतःमध्ये आकृष्ट
|| करून घेतो. मोदकही भक्तांची विघ्ने आणि त्यांना होत
|| असणारा वाईट शक्तींचा त्रास स्वतःमध्ये खेचून घेतो.
|| गणपति मोदक खातो, म्हणजे विघ्ने अन् वाईट शक्ती
|| यांचा नाश करतो.

१ } { इ } अंकुश

|| आनंद आणि विद्या यांच्या संपादनाच्या कार्यातील
|| विघातक शक्तींचा नाश करणारा.

१ } { ई } पाश

|| श्री गणपति वाईट गोष्टींना पाश टाकून दूर नेणारा,
|| असा आहे.

१ } { उ } कटीला { कमरेला } वेटोळे घातलेला नाग विश्‍वकुंडलिनी

१ } { ऊ } वेटोळे घातलेल्या नागाचा फणा जागृत कुंडलिनी

१ } { ए } उंदीर

|| उंदीर, म्हणजे रजोगुण गणपतीच्या नियंत्रणात आहे.

-:♦ मंगल मूर्ती मोरया :------------
-:♦ गणपती बाप्पा मोरया :------------
-:♦ उंदीर मामा की जय :------------



धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad