जुन्नर भागात मातीचा ढिगारा बाजूला करीत असताना वैशिष्ट्यपूर्ण भांडे प्रथमच आढळून आल्याचे जुन्नर परिसराचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी दैनिक सकाळ त्याचप्रमाणे दैनिक पुण्य - नगरी शी बोलताना सांगितले.
या बाबत माहिती देताना ताम्हाणे म्हणाले की, सध्याचे जुन्नर गाव हे जुन्या प्राचीन सातवाहन काळातील गावावर वसलेले ऐतिहासिक गाव असून मध्ययुगीन कालखंडात जुन्नरच्या बाजारपेठेशी आलेला व्यापार सबंध तसेच लोकवस्ती स्थळावरील संस्कृती साधनाच्या अवशेषाचे पुरावे नव्याने जुन्नर गावातून उजेडात येऊ लागले आहे. जुन्नर मध्ये आढळलेले भांडे हे नेहमी वापरत असलेल्या मातीच्या भांड्यापेक्षा अधिक टिकाऊ जड असल्याचे भांड्याच्या जडण - घडणीवरून दिसून येते. त्यास दगडी भांडे (स्टोनवेअर) हे नाव त्याच्या दगडा सारख्या गुणावरून मिळालेले असावे.
दगडी स्वरूपातील भांडे मजबूत तसेच छिद्ररहित असून ते इतर प्रकारच्या मातीच्या भांड्यापेक्षा अधिक समान रीतीने उष्णता वितरित करणारे असल्याने संपूर्ण अन्नभर तापमान एक समान राखण्यासाठी हे भांडे तयार केले असणार अशा प्रकारची भांडी मध्ययुगीन कालखंडात अन्न उबदार ठेवण्यासाठी तसेच अन्नामध्ये साठवलेली उष्णता हळूहळू सोडून भांडी जलद थंड होण्यास प्रतिबंध करीत असत. स्वयंपाक घरातील ठराविक भांड्याप्रमाणे या दगडी भांड्याचा वापर त्या कालखंडात करीत असणार.
दगडी भांड्याचा खालील पुष्ठभाग सपाट असल्याने भांडे उष्णता अधिक समान रीतीने वितरित करून भांड्यातील अन्न जळण्यापासून तसेच तळाशी चिकटून जाणे हे रोखण्यास मदत होत असत आणि अन्न समान रीतीने शिजत असत. जुन्नर मधील भुईकोट किल्ल्याची निर्मिती भक्कम तटबंदी , बुरूज, महाद्वार उभारणी मध्ययुगीन कालखंडात झाल्याचे दिसून येते. शिवनेरी किल्ल्या - जुन्नर मध्ये यादवकाळात व बहमनी राजवटीत मजबूत तटबंदी बांधली गेली . शत्रूवर गोळीबार करण्यासाठी ठिकठिकाणी जंग्या ठेवलेल्या दिसून येतात. तटाला विशिष्ट ठिकाणी बुरूज उभारले असून त्यामधून तोफा उडविण्यासाठी खिडक्याची रचना केलेली दिसते. त्या वेळचे शिपाई, पहारेकरी अशाच प्रकारच्या भांड्यातून अन्न उबदार ठेवण्यासाठी तसेच अन्नामध्ये साठविलेली उष्णता हळूहळू सोडून भांडी जलद थंड प्रतिबंध करणारी भांडी वापरत असावे.
जुन्नर मध्ये प्रथमच आढळलेल्या दगडी स्वरूपातील भांड्यावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध होईल असे बापूजी ताम्हाणे यांनी सांगितले.
जुन्नर मध्ये आढळलेल्या दगडी स्वरूपातील भांड्याचा वापर प्रत्यक्ष चुलीवरील जेवण करण्यासाठी तसेच द्रव पदार्थ ठेवण्यासाठी केला जात असे. भांड्यात शिजवलेले अन्न फार काळ गरम राहात असल्याने अशा प्रकारची भांडी मध्ययुगीन कालखंडात वापरली जात होती . पिढीजात वतनदार, घरंदाज, तालेवार, प्रतिष्ठित घराणी मातीच्या भाजलेल्या खपरी भांड्यासारखी अधिक टिकाऊ असणारी भांडी वापरत असत.
धन्यवाद.
माहिती साभार : बापूजी ताम्हाणे (इतिहास अभ्यासक)
अरुणा रवींद्र वाघोले (इतिहास विभाग प्रमुख)
आळे महाविद्यालय, जुन्नर ( पुणे )