भारतातील सर्वात स्वच्छ टॉप १० शहरांची यादी जाहीर झाली आहे.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरलं आहे, तर सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारने नुकताच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले आहे. त्यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे तर छत्तीसगढने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. वार्षिक सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराची पुन्हा एकदा निवड झाली आहे. इंदूरने सलग सातव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकवर आहे. तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्रात वसलेल्या सासवडला 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरी केंद्रांच्या श्रेणीत सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. या प्रकारात स्वच्छतेसाठी छत्तीसगडमधील पाटण आणि महाराष्ट्रातील लोणावळा यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. दरम्यान, वाराणसी आणि प्रयागराज ही सर्वात स्वच्छ गंगा शहरे म्हणून ओळखली गेली.
2016 पासून, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय स्वच्छ सर्वेक्षण, शहरी स्वच्छता आणि स्वच्छतेवरील सर्वात मोठे जागतिक सर्वेक्षण आयोजित करत आहे. या उपक्रमाने शहरे आणि शहरांमध्ये निरोगी स्पर्धेची भावना वाढविण्यात, नागरिकांना त्यांची सेवा प्रदान करण्यासाठी आणि स्वच्छ शहरी वातावरणाची स्थापना करण्यासाठी कार्य करण्यास प्रेरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
देशातील 10 स्वच्छ शहरांची यादी येथे आहे | Cleanest City in India 2023
रँकिंग | 2023 | 2022 | 2021 |
१ | इंदूर | इंदूर | इंदूर |
2 | सुरत | सुरत | सुरत |
3 | नवी मुंबई | नवी मुंबई | विजयवाडा |
4 | विशाखापट्टणम | विशाखापट्टणम | नवी मुंबई |
५ | भोपाळ | विजयवाडा | नवी दिल्ली |
6 | विजयवाडा | भोपाळ | अंबिकापूर |
७ | नवी दिल्ली | तिरुपती | तिरुपती |
8 | तिरुपती | म्हैसूर | पुणे |
९ | ग्रेटर हैदराबाद | नवी दिल्ली | नोएडा |
10 | पुणे | अंबिकापूर | भोपाळ |