महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्पापैकी महत्त्वाच्या कुकडी प्रकल्प अंतर्गत वडज धरण बांधण्यात आले. जुन्नर तालुक्यातील मावळ पट्ट्यातील जास्त पाऊस पडणाऱ्या आंबोली मध्ये मीना नदीचा उगम होतो. याच मीना नदीवर वडज गावाजवळ वडज धरण बांधण्यात आले.
या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे मातीमध्ये करण्यात आले असून धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर आहे. या धरणातून ४० किमीचा कॅनॉल देखील काढण्यात आला आहे.
पावसाळ्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने धरणावर गर्दी करतात. या धरणापासून जवळच वडजचे आराध्य दैवत कुलस्वामी खंडेरायाचे मंदिर आहे. तसेच ओझर, लेण्याद्री अष्टविनायक गणपती तसेच शिवजन्मभूमी शिवनेरी देखील जवळ आहे. पर्यटकांना पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी जुन्नर तालुका हे एक उत्तम ठिकाण आहे.
धन्यवाद.
माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक