जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) प्रकल्प, खोडद ता.जुन्नर जि.पुणे | GMRT Project Junnar Tourism in Marathi

जगातील सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण अशी ओळख असलेला जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद येथील दुर्बिणींचा समूह आहे. खोडद आणि परिसरात एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. प्रा. गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली १९७० साली उटी येथील रेडिओ दुर्बीण आणि २००० साली खोडद येथील जीएमआरटी या रेडिओ दुर्बिणी बांधल्या गेल्या.


प्रकल्प माहिती :

सूर्यमाला आणि आकाशगंगेत दिसणाऱ्या तारे, ग्रह, चंद्र, धूमकेतू अशा सगळ्यांबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. इ स सोळाव्या शतकात पिसाचा वैज्ञानिक अशी ओळख असलेल्या गॅलिलिओ गॅलिली या इटालियन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. तिथूनच खरे अनेक अज्ञात असलेले ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने माणसाच्या खगोलशास्त्रविषयक ज्ञानात मोलाची भर पडली.

खगोलनिरीक्षणासाठी रेडिओ लहरींचा उपयोग करायलाही सुरुवात झाली.

आकाशगंगेत घडत असलेल्या अन अनेक घडामोडींमुळे विद्युतचुंबकीय लहरींचं (Electromagnetic Waves) उत्सर्जन होत असतं. रेडिओ दुर्बिणींचा वापर करुन आकाशात होत असलेल्या घडामोडींकडे लक्ष्य ठेवलं जातं आणि उपलब्ध माहितीच्या आधारे नवनवीन शोध लावले जातात.आकाशगंगेत असणाऱ्या अनेक तारकाविश्वे / दीर्घिका (Galaxies), स्पंदक ( Pulsars) अशा रेडिओ स्त्रोतांची निरीक्षणे रेडिओ दुर्बिणींद्वारे घेतली जातात. त्याचसोबत इतर ग्रहावर काही जीवसृष्टी आहे का ,याचा अभ्यास केला जातो.

GMRT खोडद या प्रकल्पात एकूण ३० डिश अँटेना असून ,इंग्रजी Y आकारात त्यांची मांडणी केली आहे. प्रत्येक अँटेनाचा व्यास हा ४५ मीटर आहे. ३० पैकी एकूण १४ अँटेना हे जवळच्या परिसरात असून उर्वरित १६ अँटेना हे १४ किलोमीटर परिसरात विखुरले आहेत.

GMRT डिश अँटेना प्रतिरूप: 


सर्व डिश अँटेना मिळून तयार झालेली माहिती ,यावर गणितं मांडणी करून निष्कर्ष काढले जातात .अनेक किचकट गणिती प्रक्रियांनंतर रेडिओ स्त्रोताची ’ प्रतिमा’ मिळते.

चला तर मग , तांत्रिक दृष्ट्या थोडाश्या किचकट असलेल्या परंतु आवहनात्मक आणि तुमच्या मनात कुतुहूल असलेल्या या प्रकल्पाला एकदा नक्कीच भेट देऊ.

भेटीची वेळ : दर शुक्रवारी (पूर्व परवानगी घेऊनच) आपण इथे भेट देऊ शकता. तसेच दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त येथे मोठे विज्ञान प्रदर्शनही भरवले जाते.

अधिक छायाचित्रे 




जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) प्रकल्प, खोडद  ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर (नारायणगाव) , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव) एसटी बस ची सोय आहे. जुन्नर आणि नारायणगाव पासून एसटी बस, जीप ने जाता येते . 

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक 

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ 



धन्यवाद. 

लेखक: श्री.प्रविण गोविंद दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad