मान्सून येणार रे.... भारतात या दिवशी होणार मान्सूनचे आगमन, हवामान खात्याचा अंदाज | Monsoon in Marathi

सर्वजण ज्याच्या आगमनाकडे चातकासारखी डोळे लावून वाट बघत असतात त्या मान्सूनच्या आगमनाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.


१ जूनला केरळमधून मान्सून भारतात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल व्हायला वातावरण हे पोषक असल्याचा अंदाज तसेच हा मान्सून १० ते १५ जूनपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात पोहोचेल असंही भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन च्या संकटात यंदाचा मान्सून अर्थव्यवस्थेला पुन्हा गती प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतेक शेती ही जून ते सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून असते. कोरोना आणि लॉकडाऊन मुळे तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी यंदाचा पाऊस चांगला होणं आणि शेतीतून उत्पन्न जास्त येणं गरजेचं आहे

यंदाच्या वर्षीचा मान्सून हा सरासरी असेल. यावेळच्या मान्सूनचं प्रमाण १०० टक्के असेल. त्यामुळे शेतीचं उत्पन्न जास्त होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

धन्यवाद.

माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad