Google मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार 75 हजारांचा भत्ता | Google in Marathi

जगातील सगळ्यात लोकप्रिय कंपनी पैकी एक असलेल्या गूगल ने आपल्या घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १००० अमेरिकन डॉलर म्हणजेच ७५ हजार भारतीय रुपये वर्क फ्रॉम होम भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.


कोरोनाच्या जागतिक संकटामुळे बहुतेक आय टी कंपन्यातील कर्मचारी हे घरूनच काम करत आहे. गूगल हि त्याला अपवाद नाहीये. वर्क फ्रॉम होम दरम्यान कर्मचाऱ्यांनी ज्या आवश्यक उपकरणांसाठी खर्च केला आहे, त्याकरता ही रक्कम देण्यात येणार आहे.

अल्फाबेट आणि Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैपासून जगभरातील अनेक शहरांमध्ये गुगलचे अनेक नवीन ऑफिसेस उघडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना रोटेशन बेसिसवर काम करण्याची संधी मिळेल, असं मत सुंदर पिचाई यांनी व्यक्त केलं.

धन्यवाद.

माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad