कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम WFH म्हणजेच घरून घरून काम करण्याची परवानगी दिली आहेत. त्यामुळे सध्या देशभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे. सध्या आपल्या मुलभूत गरजांमध्ये इंटरनेटचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन ने आपल्या ग्राहकांसाठी दररोज 3GB डाटा आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणारे बेस्ट प्रीपेड प्लान्स लाँच केले आहेत.
जिओचा 3GB डाटा प्लान :
- जिओकडे सध्या 349 रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. ज्यामध्ये दररोज 3GB डाटा मिळतो.
- या प्लानची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
- या पॅकमध्ये जिओ टू जिओसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
- तर, नॉन-जिओ नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये 1000 मिनट मिळतात.
- या प्लानमध्ये दररोज 100 फ्री एसएमएस देखील मिळतात.
- एवढचं नाहीतर या प्लानसोबत जिओ च्या सर्व ऍप चं फ्री सब्स्क्रिप्शन मिळतं.
- एअरटेलकडे 398 रूपयांचा डाटा प्लान आहे.
- ज्यामध्ये दररोज 100 एसएमएस फ्री असून अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे.
- या प्लानची वॅलिडिटी 28 दिवसांसाठी आहे.
- यामध्ये दररोज 3GB डाटा मिळतो.
- याव्यतिरिक्त या प्लानसोबत झी5 सोबतच एअरटेल एक्सट्रीम आण विंक म्युझिकच फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.
व्होडाफोन 3GB डाटा प्लान :
- व्होडाफोनच्या 399 रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे.
- यामध्ये दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात.
- या प्लानमध्ये 1.5GB+1.5GB डाटा मिळतो.
- याव्यतिरिक्त या प्लानसोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
- एवढचं नाहीतर यामध्ये झी5 आणि व्होडाफोन प्लेचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.
धन्यवाद.
माहिती संकलन : कु. हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक