बर्गर किंग : ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे म्हणून ‘बर्गर किंग’ची भन्नाट आयडीया | Burgerking in Marathi

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशामध्ये लॉकडाउन सुरु आहे. भारताबरोबरच इतर देशांनाही वेळोवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवत नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. मात्र असं असतानाच काही देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तेथील एक एक सेवा हळू हळू सुरु करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे कोरोनानंतरचे जग हे वेगळं असेल याची झलक येथे पहायला मिळत आहे.

सर्वात मोठा बदल हा हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांशी संबंधित क्षेत्रामध्ये झाला आहे. अनेक हॉटेल्सच्या रचनाबदलण्यापासून ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना अंमलात आणल्या जात आहेत. फास्ट फूड चैन असणाऱ्या बर्गर किंगनेही अशीच एक भन्नाट कल्पना अंमलात आणली असून सध्या ती चर्चेत आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि लोकांनी एकमेकांपासून लांब उभे राहत सोशल डिस्टन्सिंग पाळावे म्हणून बर्गर किंगने अवाढव्य आकाराचे मुकुटं म्हणजेच क्राऊन बनवली आहेत. हे क्राऊन ग्राहकांना ऑर्डरबरोबर दिलं जातं. त्यामुळेच ऑर्डर घेतल्यानंतर ग्राहक एकमेकांपासून बरेच लांब उभं राहून बर्गरचा आनंद घेतात. या अवाढव्य क्राऊनचा फोटो जर्मनीमधील डॉइशलॅण्ड (Deutschland) येथील बर्गर किंगच्या फेसबुक पेजवरुन शेअऱ करण्यात आला आहे. “सोशल डिस्टन्सिंगही एखाद्या राज्याप्रमाणेच करा,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आला आहे.

इतकच नाही तर हे मुकूट घरी कसं बनवता येईल यासंदर्भाती एक पोस्टही कमेंटमध्ये बर्गर किंगकडून करण्यात आली आहे.




धन्यवाद. 

माहिती संकलन : कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad