पाककृती : अळूच्या वड्या | Aluchi Vadi Racipe in Marathi

घरातील लहान असो किंवा मोठी मंडळींचा आवडता पदार्थ म्हणजेच अळूच्या वड्या. आता श्रावण महिना सुरु  होईल त्यामुळे श्रावण महिन्यात हमखास केल्या जाणाऱ्या अळूच्या वड्या घरी कश्या करायच्या ते बघू या.



साहित्य :

  • अळूची पाने
  • ४ चमचे हरभरा डाळीचे पीठ
  • 2 चमचे लाल तिखट
  • हळद
  • चवीनुसार मीठ
  • तीळ २ चमचा
  • तळण्यासाठी तेल
  • ओलं खोबरं
  • चिमूटभर हिंग
  • कोथिंबीर


कृती :

  • अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठ कापून टाकावेत.
  • डाळीच्या पिठामध्ये लाल तिखट हळद, मीठ, तीळ, हिंग, घालून एकजीव करून घ्यावे. थोडेसे पाणी घालून भिजवून घ्यावे.
  • पोळपाटावर पानाच्या मागील बाजूवर पिठाचा पातळ थर द्यावा. त्यावर दुसरे पान उलटे ठेवावे आणि पीठ पसरावे.
  • अशा प्रकारे एकावर एक 4 पानांवर मिश्रण पसरून दोन्ही बाजूने आत पान दुमडून छान रोल करावा. रोल करताना मध्ये मध्ये मिश्रण लावावे.
  • कूकरच्या डब्याला तेल लावून रोल ठेऊन कुकरमध्ये ठेवून ३ शिट्ट्या घ्याव्यात.
  • थंड झाल्यावर बारीक काप करून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यावे. सजावटीसाठी ओलं खोबरं आणि कोथिंबीर पसरवावी.


टीप : अळूच्या वडीमध्ये चिंच आणि थोडासा गुळ घातला तरी चालेल.


धन्यवाद.

माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad