!! श्री चिंतामणी गणपती प्रसन्न !!
गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट आणि ‘विनायक या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे.अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत.स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम || बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा.
शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-
- पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
- दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
- तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
- चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
- पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
- सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
- सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
- आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती
अशा या अष्टविनायक यात्रेतील पाचव्या पालीच्या श्री चिंतामणी गणपती ची माहिती आपण बघूया.
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा पाचवा गणपती आहे.थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे.येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली.कपिल ऋषीं जवळील चिंतामणी रत्नाचा महिमा पाहून,गनासुराने ते रत्न हिसकावून घेतले. श्री गणपतीने गनासुराला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला.हेच ते रत्न कपिल मुनींनी विनायकाच्या गळ्यात बांधले.तेव्हापासून गणेशाला चिंतामणी नावाने संबोधले जाऊ लागले. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला 'कदंबपूर' असेसुद्धा म्हणतात.
मंदिर आणि परिसर :
चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. देवळाचे महाद्वार हे उत्तरेकडे असून महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा तसेच शमी व मंदार वृक्ष आहेत.मंदिराच्या आवारात एक छोटे शिवमंदिर आहे.गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत.
पुण्यातील थोर गणेशभक्त माधवराव पेशवे यांचं निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची येथे समाधी आहे.
स्थान : तिर्थक्षेत्र थेऊर , ता. हवेली , जि. पुणे
जवळची ठिकाणे :
मंदिर आणि परिसर :
चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. देवळाचे महाद्वार हे उत्तरेकडे असून महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा तसेच शमी व मंदार वृक्ष आहेत.मंदिराच्या आवारात एक छोटे शिवमंदिर आहे.गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत.
पुण्यातील थोर गणेशभक्त माधवराव पेशवे यांचं निधन झाल्यावर त्यांना सती गेलेल्या रमाबाईंची येथे समाधी आहे.
स्थान : तिर्थक्षेत्र थेऊर , ता. हवेली , जि. पुणे
जवळची ठिकाणे :
- तुळापुर : संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचे स्मारक .
- केडगाव बेट :श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर
- भुलेश्वर : प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर.
- पुणे-थेऊर: २७ कि.मी.
- मुंबई-पुणे-थेऊर: १८० कि.मी.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.
धन्यवाद.
माहिती संकलन : श्री.प्रविण गोविंद दांगट