!! श्री वरदविनायक गणपती प्रसन्न !!
स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम || बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा.
शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-
- पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
- दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
- तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
- चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
- पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
- सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
- सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
- आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती
अशा या अष्टविनायक यात्रेतील चौथ्या महाडच्या श्री वरदविनायक गणपती ची माहिती आपण बघूया.
चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक :
महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात.ऋषी गृत्समद यांनी श्री गणेशाची येथे स्थापना केली.इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले.
मंदिर आणि परिसर :
भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे.१७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले.श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे. मंदिराच्या चारही बाजूंना हत्ती कोरलेले आहेत. मंदिर चिरेबंदी आहे.इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत.एक मूर्ती शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे.
हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात.
स्थान : तिर्थक्षेत्र महाड, ता. खालापूर, जि. रायगड
जवळची ठिकाणे :

- खंडाळा व लोणावळा ही थंड हवेचे ठिकाणे.
- कार्ला : एकविरा देवीचे स्थान आणि लेण्या.
- देहू :संत तुकाराम यांचे वास्तव्य असलेले स्थळ.
- पुणे-खालापूर-हाळ : ९० कि.मी.
- मुंबई-खालापूर-हाळ : ८३ कि.मी.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.
धन्यवाद.
माहिती संकलन : श्री.प्रविण गोविंद दांगट