घरातील लहान मोठ्या मंडळींचा आवडता पदार्थ म्हणजे दाल माखनी. अगदी हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर ही दाल माखनी ची ऑर्डर दिली नाही असा होताच नाही. हिच दाल माखनी घरी कशी बनवायची ते आज आपण बघूया.
साहित्य :
कृती :
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट
साहित्य :
- अर्धा कप राजमा
- अर्धा कप मसूर डाळ
- २ चमचे चना डाळ
- कढीपत्ता
- १ कांदा बारीक कापून
- १ टोमॅटो
- गरम मसाला
- हिंग
- कोंथिबीर
- मीठ
- लाल तिखट
- तेल/लोणी
कृती :
- सर्वप्रथम तिन्ही डाळी धुवून कुकरला तीन शिट्ट्या घ्याव्या.
- कढईमध्ये तेल किंवा लोणी गरम करून त्यामध्ये कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यात कढीपत्ता, टोमॅटो पेस्ट आणि हिंग-गरम मसाला, लाल तिखट घालून परतून घ्यावे.
- शिजलेल्या डाळी घोटून फोडणीमध्ये घालाव्यात. आवश्यकतेनुसार मीठ घालावे. कोथींबीर घालून सजवावे.
- १० मिनटे मंद गॅसवर शिजवून घ्या. सर्व्ह करताना वरून लोणी किंवा बटर घ्यावे.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट