तिळाचे पदार्थ थंडीमध्ये खाण्याचे अनेक फायदे आहेत. साजूक तुपाबरोबर गूळ सेवन केला, तर उष्ण पडत नाही. म्हणूनच तर संक्रातीला तिळाची पोळी तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे. तिळ आणि गुळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत, हि तिळाची पोळी कशी बनवायची हे आपण बघूया.
साहित्य :
- १ वाटी तिळ
- १ वाटी खोबरे
- १ वाटी शेंगदाणे
- गुल किसून
- वेलची पावडर
- तूप
पोळीसाठी :
- २ वाटी मैदा
- १ चमचा तेल
- थोडस मीठ
कृती :
- मैद्यामध्ये मीठ आणि थोडेसे तेल घालून एकत्र करून पीठ मळून घ्यावे. हे पीठ साधारण अर्धा तास भिजून द्यावे.
- तिळ भाजून मिक्सरला बारीक करून घ्या. शेंगदाणे भाजून साले काढून मिक्सरला बारीक करून घ्या. खोबरे लालसर भाजून बारीक करून घ्या.
- सगळं मिक्स करून त्यामध्ये किसलेला गुळ घालून सारण तयार करा . वेलची पावडर घाला.
- भिजवून ठेवलेल पीठ घेऊन त्याचे लहान गोळे करणी हातावर फिरवून त्यात सारण भरा आणि हलक्या हाताने पुरणपोळी प्रमाणे लाटून घ्या.
- दोन्ही बाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्या.
फायदे :
- तिळात कॅल्शियम आहे, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत.
- तिळ खाल्ल्याने थंडी कमी होऊन उष्णता राहण्यास मदत होते.
- मधुमेहींसाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तिळ खाल्ल्यास फायदा होतो.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट