पाककृती : राईस स्पेशल : तवा पुलाव | Tava Pulav Racipe in Marathi

सर्वांचा आवडता आणि झटपट होणारा तवा पुलाव घरी कसा बनवायचा ते आपण आज शिकूया.


साहित्य :
  • बासमती तांदूळ १ वाटी
  • बटर
  • बारीक कापलेला कांदा
  • जिरे-मोहरी
  • सिमला मिरची
  • गाजर
  • टोमॅटो
  • मटार
  • पावभाजी मसाला
  • लाल तिखट
  • कोथींबीर
  • मीठ

कृती : 
  • प्रथम बासमती तांदूळ धुवून कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्याव्या. एका पॅनमध्ये बटर गरम करून घ्यावे त्यात जिरे -मोहरी आणि कांदा घालून परतून घ्यावे.
  • कांदा तांबूस झाल्यावर त्यामध्ये आले-लसूण पेस्ट , बारीक कापून सिमला, गाजर घालावे.
  • टोमॅटो आणि मटार घालून फोडणी चांगले हलवून घ्यावी आणि झाकण ठेवावे. भाज्या थोड्या शिजत आल्यावर त्यात पावभाजी मसाला आणि मीठ घालावे.
  • आता त्यामध्ये शिजवलेला भात ,लाल तिखट घालून हलवून घ्यावे. आणि वरून कोथींबीर टाकून १० मिनिटे मंद गॅसवर शिजून द्यावे. 

धन्यवाद. 

माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad