रविवार आणि चिकन यांचा एक वेगळंच नातं आहे. वीकेंड म्हटलं कि बहुतेक घरांमध्ये चिकन चा बेत असतो किंवा कधी कोणी पाहुणे येणार असेल तर हमखास चिकन चा बेत बनतो. चिकन वेगवेगळ्या प्रकारे बनवता येत यातीलच एक प्रकार म्हणजे चिकन मसाला. चिकन मसाला घरी कसा बनवायचं ते आज आपण बघूया.
साहित्य :
अर्धा किलो ब्रेस्ट पिसेस आणि लेग्ज पिसेस
कांदा बारीक चिरलेला
आले-लसूण पेस्ट
हळद
लाल तिखट
२ टोमॅटो
कोथींबीर
गरम मसाला
चवीनुसार मीठ
तेल
कृती :
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट
साहित्य :
अर्धा किलो ब्रेस्ट पिसेस आणि लेग्ज पिसेस
कांदा बारीक चिरलेला
आले-लसूण पेस्ट
हळद
लाल तिखट
२ टोमॅटो
कोथींबीर
गरम मसाला
चवीनुसार मीठ
तेल
कृती :
- चिकनचे मोठे मोठे तुकडे करून घ्यावेत . कढईमधे तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा.
- कांदा लालसर रंगाचा झाल्यावर थोडेसे पाणी शिंपडावे म्हणजे कांदयाच्या रंग चांगला राहतो .
- फोडणीमध्ये आले-लसूण आणि टोमॅटो घालून थोडे परतावे . लाल तिखट , गरम मसाला , मीठ टाकून चांगले परतून घ्यावे .
- नंतर चिकनचे तुकडे घालून मग कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे.
- आवश्यकतेनुसार पाणी टाकावे आणि थोडा वेळ शिजून द्यावे आणि वरून कोथींबीर टाकावी.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट