संडे स्पेशल : खबरदार वख्खा विख्खी वुख्खू बातमीपत्र | Marathi Movie Sunday Special in Marathi

आमच्या खबरदार वख्खा विख्खी वुख्खू बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आज आपण या संडे स्पेशल बातमी पत्रात आपण मराठी मनोरंजन सृष्टीतील ठळक बातम्यांच्या धावता आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरवात करू या.

आम्हीजुन्नरकर.com

टिप : सदरचे बातमीपत्र मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अजरामर भूमिकांवर आधारित केवळ मनोरंजन हेतूने करण्यात आले असून हे बातमीपत्र पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. जे अतिसामान्य असतील तेच लॉकडाऊन चा नियम मोडतील. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आमच्या मनोरंजन बातमीपत्राचा आनंद घ्या. धन्यवाद. 


नवकोटनारायण उद्योगभूषण यदुनाथ जवळकर यांच्या खोकल्यात वाढ. डॉक्टरांचा कोविड चाचणी करण्याचा सल्ला.


धुमधडाका चित्रपटातील नवकोटनारायण उद्योगभूषण यदुनाथ जवळकर यांच्या वख्खा विख्खी वुख्खू खोकल्यात गेल्या २ दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ते सध्या धनाजीराव वाकडे यांच्या श्रीरामपूर मधील बंगल्यात क्वारंटाईन आहेत. त्यांच्यात कोरोनाचे प्राथमिक लक्षणे दिसून येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला असून आज दुपारी १२ वाजता ते श्रीरामपूर मधील वाकडोजीराव हॉस्पिटल मध्ये चाचणी करण्यासाठी जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे.


ह्यालागाड त्यालागाड ठरले कोरोनाचे नवे हॉटस्पॉट 


सोलापूर जिल्यातील जत्रा चित्रपटातील ह्यालागाड त्यालागाड हि दोन गावे कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. गेल्या २ दिवसात येथील २० हुन अधीक जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले असून ३० हुन अधिक जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत. अधिकारी स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवूत असून येथील सरपंच आणि गावकरी आपापसातील भांडण बाजूला ठेवून शासनाला सहकार्य करत आहेत.


सुप्रसिद्ध स्मग्लर बाबू कालिया पुन्हा जेल मधून फरार 


नवरा माझा नवसाचा चित्रपटातील सुप्रसिद्ध स्मग्लर बाबू कालियाला २००४ साली ८० कोटींचे हिरे घेऊन लालपरी एसटी बस ने दुबईला पळून जात असताना पोलिसांनी गणपतीपुळे येथे रंगेहात पकडले होते. तेव्हा पासून बाबू कालिया पुण्यातील येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. काल अचानक बाबू कालियाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला ससून हॉस्पिटल येथे चाचणीसाठी नेताना बॉलिवूड स्टाईल ने त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले. पोलीस त्याचा शोध घेत आहे.


इन्स्पेक्टर महेश जाधव लवकरच होणार पोलीस निरीक्षक 


झपाटलेला, धडाकेबाज, थरथराट, माझा छकुला या चित्रपटातील डॅशिंग इन्स्पेक्टर महेश जाधव यांची अखेर लवकरच पोलीस निरीक्षक पदी वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.


लीलाबाई काळभोर यांच्यावरील मोतीबिंदू शस्रक्रिया अपयशस्वी 


अशी हि बनवाबनवी चित्रपटातील श्रीमती लीलाबाई काळभोर यांच्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये काल रात्री मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आली. शस्रक्रिया दरम्यान त्यांचा बीपी वाढल्याने शस्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असून २ दिवसानंतर पुन्हा त्यांच्यावर मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनने सांगितले आहेत. धनंजय माने, सुधा, पार्वती आणि शांतनू माने काल रात्री पासून हॉस्पिटल मध्ये तळ ठोकून आहेत.


इनामदार भुसणळे यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका


पछाडलेला चित्रपटातील गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व इनामदार भुसणळे यांना काल रात्री दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला असून त्यांचे स्वीय सहाय्यक किरकिरे यांनी त्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून मध्यरात्री त्यांच्या वर बायपास शस्रक्रिया करण्यात आली. सध्या ते ३ ते ४ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून सध्या ते व्हेंटिलेटर वर आहेत. सकाळी हि बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृती मध्ये लवकर सुधारणा होण्यासाठी ठिकठिकाणी होमहवन करत आहेत. 

वरील बातमीपत्र आपल्याला आवडल्यास आणि असेच नवीन मनोरंजन बातमीपत्र हवे असल्यास आम्हाला खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. 

धन्यवाद. 

लेखक: कु. हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad