आरोग्य : सुखी जीवनाचा कानमंत्र | Mantra of Happy Life in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात. आयुष्यात चढ उतार येणंही तितकच गरजेचं आहे कारण माणूस हा अनुभवातून शिकत असतो. कठीण प्रसंगात तोंड देण्याची, आव्हानं पेलण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची ता कत माणसाला यातूनच मिळत असते. तर कधी माणसाला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे याचा प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.


आयुष्यात आनंदी राहण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी खालील नियमांचे नक्की पालन करावे.

  • स्वतः वर विश्वास ठेवा.
  • तुमची आवड ओळखा, आपले ध्येय ठरवा आणि स्वतः मध्ये गुंतवणूक करा.
  • प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगायला शिका कारण गेलेली वेळ येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे काही सांगता येत नाही.
  • आयुष्य नेहमी तिसऱ्या Gear वर ठेवायचं, Load घ्यायचा आणि Seed पण.
  • चार चौघात उठून दिसेल अस व्यक्तीमत्त्व  बनवा.
  • जास्त वाचा, जास्त लिहा.
  • कधी कोणावर जास्त रागावू नये. चूक झाली तर माफी मागावी.
  • मेहनतीवर विश्वास ठेवा, नशिबावर नाही.
  • अभ्यास करायच्या वयात प्रेमात पडू नका.
  • कष्ट करायला लाजू नका. तुम्हाला यशस्वी होण्या पासून कोणीच अडवू शकणार नाही. 
  • आनंद शोधा , गरजा तर आयुष्यभर संपणार नाही.
  • स्वतः मध्ये बदल घडवा कारण बदल घडवल्याशिवाय आयुष्य घडत नाही.
  • कोणाची नक्कल करू नका, स्वतःची ओळख निर्माण करा.
  • प्रमाणापेक्षा जास्त लालची पणा नसावा.
  • स्वतः पेक्षा इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका.
  • प्रमाणापेक्षा जास्त खर्च करू नका.
  • गरज नसलेल्या वस्तूंसाठी कधीच कर्ज काढून ऐश करू नका.
  • एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज कधीच काढू नका.
  • डोईजड होईल इतके कर्ज कधीच काढू नका.
  • कधीच कोणाकडून कोणत्याही गोष्टींची अपेक्षा करू नका. 
  • कधीच कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे आश्वासन देऊ नये.
  • स्वतःची तुलना इतर माणसांसोबत कधीच करू नका.
  • मनाला भावनिक होऊ देऊ नका.
  • मनाला हळवेपणाची सवय लावून घेऊ नका.
  • मित्र मंडळी आणि नातेवाईकांना आपल्या घरातील घडामोडींची कधीच जास्त माहिती देऊ नका.
  • आपण जितका पैसा कमावतो त्यातील निम्याहून अधिक पैसा जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी बचत करून ठेवावा. राहिलेल्या पैश्यातून घर खर्च करावा.
  • नातेवाईक आणि मित्र मंडळी यांमध्ये स्वतःची खोटी प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी वायफळ खर्च करू नका.
  • कोणत्याही माणसाच्या, मित्र मंडळींच्या तसेच नातेवाईकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन, कोणत्याही गोष्टीची शहनिशा न करता विश्वास ठेवायचा नसतो.
  • परिवारातील व्यक्तींनाही कमी पैश्यात चांगले जीवन जगण्याची सवय लावा.
  • टीव्ही आणि इतर ठिकाणी दिसणाऱ्या जाहिरातींना भुलून कधीच गुंतवणूक करू नका, त्यांना बळी पडू नका.
  • दारू, तंबाखू आणि इतर व्यसनची कधीच सवय करून घेऊ नका.


हा लेख आपल्या आवडल्यास आम्हाला खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

धन्यवाद.

माहिती आभार : कु. हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad