पाऊलखुणा.....
होती भेट
तुझ्या माझ्या स्वप्नांची
हरवलेल्या भावनांची
नकळत ।। १।।
पावसाची सर
बरसून आली अंगावर
इंद्रधनूच्या रंगावर
शहारली ।।२।।
मोकळ्या केसांत
हरपून गेले भान
ठेविले गहाण
हृदयाला ।।३।।
स्पर्श ओले
राहिले ना दुरावे
मनी पुरावे
दाटलेले ।।४।।
छेडिता आठवणींना
उलगडल्या आज माझ्या
पहिल्या प्रेमाच्या
पाऊलखुणा ।।५।।
धन्यवाद.
कवी : कु. मयूर महादेव पालकर, मुंबई