विशेष लेख : ग्रामपंचायत निवडणूक २०२१ | Grampanchayat Election in Marathi

महाराष्ट्रातील १५००० हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलं आहे. येत्या १५ जानेवारीला या गामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे सगळीकडे सध्या गावपातळीवर पॅनेल प्रचाराला सुरुवात झाली आहे. गावांचा  जर विकास करायचा असेल तर सुज्ञ मतदाराने योग्य उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे.त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एखाद्या पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावाच्या हितासाठी गावाचा एक 'सुज्ञ मतदार' बना आणि योग्य उमेदवाराला निवडून देण्याअगोदर प्रत्येकाने खालील गोष्टींचा नक्की विचार करावा. 


● गावात वीज आहे का.?
● गावात किती दिवे चालू आहेत.?
● गावात किती दिवे बंद आहेत.?
● गावात रस्ते कसे आहेत.?
● गावात त्यांची डागडुजी होते का.?
● सांडपाणी गटर व्यवस्था आहे का.?
● सार्वजनिक शौचालय आहे का.?
● गावात आठवडा बाजार आहे का.?
● पिण्याच्या पाण्याची सोय आहे का.?
● पाणी मुबलक सर्वांना मिळते का.?
● घरोघरी पाण्याचे नळ आहेत का.?
● गावात येणारे पाणी शुद्ध आहे का.?
● गावात शाळेची व्यवस्था आहे का.?
● शाळेसमोर मैदान व गार्डन आहे का.?
● गावात समाज मंदिर आहे का.?
● गावात व्यायाम शाळा आहे का.?
● ती व्यायाम शाळा कार्यरत आहे का.?
● गावातीळ रस्ते कसे आहेत.?
● गावाचे ध्येय धोरण काय आहे.?
● ते आपण सर्व पाळतो का.?
● मुलांना लसीकरण वेळेवर होते का.?
● गावात दवाखाना आहे का.?
● आरोग्य विषयक शिबिरे घेतात का.?
● सांस्कृतिक कार्यक्रम होतात का.?
● गरीब मुलांचे शिक्षण कसे होते.?
● त्यांच्यासाठी काय प्रयोजन आहे.?
● जेष्ठ नागरिकांचा सन्मान होतो का.?
● अकस्मात घटनेत मदत मिळते का.?
● कार्यासाठी सर्व एकत्र येतात का.?
● गावात सरपंचाचे लक्ष आहे.?
● ग्रामसेवक योजना आणतात का.?
● नागरिकाला त्याचा फायदा होतो का.?

👉 गाव ही संघटना नाही गाव हा पक्ष नाही, गाव हे मानवतेचे महान मंदिर आहे, जेथे एकोपा जोपासला जातो.

👉 मी कार्यकर्ता नाही, समाजाचा एक प्रमुख घटक आहे.

👉 माझे कर्तव्य हे असेल माझा गाव माझा स्वर्ग आहे, तो स्वर्गच राहण्यासाठी मी माणूस म्हणून कधी या गोष्टींचा विचार केला का..?

🙏मग विचार करा, नक्की बदल घडेल.🙏

🙏पक्षाचा 'कार्यकर्ता' होण्यापेक्षा गावाच्या हितासाठी गावाचा एक 'सुज्ञ मतदार व्हा.🙏


धन्यवाद. 

टिम आम्ही जुन्नरकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad