श्री ब्रह्मनाथ देवस्थान, श्रीक्षेत्र पारुंडे ता. जुन्नर जि. पुणे | Bramhnatah Temple (Junnar Tourism) in Marathi

ll श्री ब्रह्मनाथ प्रसन्न ll         


शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील श्री ब्रह्मनाथ देवस्थान हे प्राचीन असून हे मंदिर सुंदर अशा कोरीव नक्षीकामाचा अत्यंत उत्कृष्ट असा नमुना आहे. हे ब्रह्मनाथाचे  मंदिर हे शिवजन्मभुमीच्या पायथ्याशी असलेल्या पारुंडे गावात वसलेले आहे. या मंदिराची उंची सुमारे ८६० मी इतकी आहे. शांत आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पारुंडे या गावात भव्य असे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात दगडांचे खांब उभारलेले आहेत व त्यावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे तसेच देव देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. नक्षीकाम केलेला दगड हा अतिशय कठीण आहे व या कळ्या पाषाण वरती नक्षीकाम कसे केले असेल याचे मनात आश्चर्य निर्माण होते. मंदिराच्या शेजारीच "श्री ब्रह्मनाथ" महाराजांची समाधी आहे.  हे तीर्थक्षेत्र अतिशय प्राचीन असून प्रसिद्ध आहे.
                                                                                                         
 श्री ब्रह्मनाथ मंदिर हे प्रमुख ग्राम देवस्थान पंचक्रोशीत दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे ऐक केंद्र असणारे पारुंडे गाव दर बारा वर्षांनी झुंडी रूपाने नाशिक नंतर भरणाऱ्या कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. याशिवाय ब्रह्मनाथ मंदिर हे योग संबंधीचा शिल्पांचा ऐक आगळावेगळा आणि दुर्मिळ असा वारसा टिकुन शेकडो वर्ष दिमाखात उभे आहे. हे मंदिर शिलाहार राजा झंझ आणि वंशजांनी गोदावरी पासून भीमा नद्यांच्या उगमा जवळ बांधलेल्या बारा शिवमंदिरात परंपरेत ऐक आहे असं म्हटलं जातं. गावाबाहेरील कमंडलूच्या आकाराप्रमाणे वाहणाऱ्या कमंडलू नदीच्या किनारी असलेलं हे मंदिर आहे. पारुंडे असे गावाचे नाव ' पराशर ऋषींच्या ' वास्तव्याने पडल्याचे आणि पराशर ऋषींनी याठिकाणी शेतीचा अभ्यास करून निरीक्षणे नोंदवित कृषी पराशर या ग्रंथाची निर्मिती केल्याचे म्हटले जाते.                                                                                    

अंदाजे आठशे वर्षांपूर्वी नाथपंथीय संन्यासी बाबा ब्रह्मनाथ यांच्या समाधी नंतर बाराव्या तेराव्या शतकात या मंदिराची स्थापना झाली असावी. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असून समोरच बाबा ब्रह्मनाथ आणि बाबा ज्वालानाथ यांचे मुखवटे आहे. त्यापुढे दगडी सभामंडप आहे. जीर्णद्धाराच्या निमित्ताने वेळोवेळी मंदिराचा कायापालट होताना मंदिराचा मुळ ठाचा जरी काही प्रमाणात बदलला असला तरी गभर्याबहेर असणाऱ्या सभामंडपातील सहा दगडी खांब हे अत्यंत सुबक कलाकुसरती शिल्पांचे वैशिष्ट दर्शवत आजही उभे आहेत. या खांबावरील शिल्पामधून तत्कालीन नाथपंथीय संप्रदायाचा योगाभ्यास इतिहास किंवा मागोवा आपल्याला विविध आसनांमधून, मुद्रंमधून, क्रियांमधून, नृत्याच्या विविध आकृत्यावरून आपणास पहावयास मिळते. 

आपण जेव्हा मंदिराच्या नव्या सभामंडपातील काहीशा अंधाऱ्या असणाऱ्या जुन्या सभामंडपात प्रवेश करतो त्यावेळी आपणास सहा खांब नजरेस पडतात . त्यावरील कलाकुसर जर आपण बारकाईने पहिली तर त्यावर उर्ध्व धनुरासन, नाथराजासन,गरुडासान, नौकासान, गोमुखासान, अनंतासान, सुखासान यासह विविध नृत्यमुद्रा अशी शिल्प आपल्या नजरेस पडतात .                                             

तसेच पारुंडे या गावात दर वर्षी श्रावणी सोमवार मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात. ब्रह्मनाथ देवाची या श्रावणातल्या महिन्यात यात्रा असते. या महिन्यातला तीन सोमवारी यात्रा भरते .तसेच तिसऱ्या सोमवारी या देवाची पालखी फुटकड्यावर्ती नेली जाते. यात्रेच्या दिवशी या गावात अनेक बाहेरचे गावचे लोक गाडाबागाड घेऊन येतात.  

अधिक छायाचित्रे:












श्री ब्रह्मनाथ देवस्थान, श्रीक्षेत्र पारुंडे ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे. जुन्नर पासून जुन्नर - पारुंडे , जुन्नर - चिंचोली, जुन्नर - वैष्णवधाम एसटी  ने पारुंडे ला उतरावे. 

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक 

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ 

अश्या या पारुंडेच्या श्री ब्रह्मनाथ मंदिराला तसेच जवळच असणाऱ्या श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान आणि  किल्ले शिवनेरी ला नक्की भेट द्या. 



अधिक वाचा :

धन्यवाद. 

माहिती संकलन: दिव्या सुनिल चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad