मेहेंदी आणि बरंच काही...!!! | Mehendi in Marathi



सण कोणताही असो, महिलांना मेहंदी काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. हिंदू धर्मात मेहंदी काढणे शुभ मानले जाते. भारतीय परंपरेत विवाह सोहळ्यात नववधुला मेहंदी काढण्याची पद्धत आहे.सिनेमातील मेहंदीवर रचलेली गाणी व नृत्य अशा मनोरंजक कार्यक्रमांंची धमाल असल्याशिवाय हा लग्नविधी पुर्ण होत नाही.प्रत्येक नववधू या मेहंदीच्या विधीची अगदी आतुरतेने वाट बघते.अशात तिच्या हातावर रंगलेली मनमोहक मेहंदीची डिझाईन तिच्या या आनंदात अधिक भर घालते.

असे मानले जाते की, हातावरील मेहंदीचा रंग जितका गढद चढतो तितके नववधु व तिच्या जोडीदारातील प्रेम अधिक दृढ होते.त्याचप्रमाणे अजून एक असा समज आहे की, जितके जास्त दिवस तिच्या हातावर मेहंदी टिकते तितके जास्त त्या नववधुला तिच्या सासरी प्रेम मिळते.मेहंदीच्या निरनिराळ्या डिझाईन्स मध्ये देखील जीवनातल्या अनेक गोष्टीचे संकेत लपलेले असतात. आज आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या या आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाईन्स आणल्या आहे.



मेहेंदी चे प्रकार

1) अरेबिक डिझाईन

वेस्टर्न शैली आणि सध्या आधुनिक गोष्टींची सांगड घालत, भारतीय मेंदीची तुलाना अरबी अर्थात अरेबिक डिझाईन्ससह करण्यात येते. मात्र ही मेंदी अतिशय सोपी आणि सुंदर दिसते.




2) बॉर्डर डिझाईन

बॉर्डर मेहंदीची डिझाईन सर्वांचं लक्ष वेधून घेतं आणि आकर्षित करते. या डिझाईन्समध्ये सर्व बॉर्डर्स हायलाईट करण्यात येतात आणि त्यामध्ये अतिशय बारीक आणि आकर्षक मेंदीचं डिझाईन काढण्यात येते.



3) पारंपरिक डिझाईन

पारंपरिक डिझाईनमध्ये लग्नाच्या वेळी तयार करण्यात येणारे कलश आणि ढोल ताशे यांची आकृती काढण्यात येते. यामध्ये लग्नातील विधींना प्राधान्य असून वरमाळा, नवरीची डोली याप्रकारचे डिझाईन्स काढण्यात येतात.




4) दुल्हन मेहेंदी 

लग्नात नवरीचं रूप आणि सौंदर्य अधिक खुलून दिसावं हा यामागील प्रमूख हेतू असतो. कारण मेंदीमुळे नववधूचे हात आणि पाय अधिक सुंदर आणि नाजूक दिसतात. हातापायावरील नाजूक मेंदीच्या डिझाईनमुळे तिचे हाता-पाय इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसतात.  



मेंदी हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं यासाठी नवरीच्या हातावर मेंदी काढली जाते. कुंकू, चुडा, सिंदूर याचप्रमाणे मेंदी लावल्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडते. म्हणूनच लग्नाप्रमाणेच वटपौर्णिमा अथवा इतर सुवासिनी पुजनाच्या कार्यक्रमात मेंदी अवश्य लावली जाते.

कोणत्याही नववधूसाठी, तिच्या लेहेंगा, दागिने, मेकअप आणि केसांच्या शैलीव्यतिरिक्त, मेहंदीदेखील खूप खास आहे. मुलीच्या हातावरील मेहंदीचा रंग गडद असेल तर तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मेहंदीचा रंग फिका राहिला तर तिचे मन उदास होते, असे त्यांचे म्हणणे आहे. तुम्हीही हातावर मेहंदी काढणार असाल तर आमची ही बातमी नक्की पहा. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की डार्क मेहंदी बनवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय केले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
मेहंदी लावण्यापूर्वी आणि नंतर या गोष्टी लक्षात ठेवा

मेहंदी लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा आणि स्वच्छ करा जेणेकरून तुमच्या हातावर कोणतेही लोशन किंवा तेल असेल तर ते निघून जाईल. मेहंदी लावण्यापूर्वी वॅक्सिंग किंवा स्क्रबिंग करा कारण मेंदी लावल्यानंतर स्क्रबिंग किंवा वॅक्सिंग केल्याने मेहंदीचा रंग फिका होऊ शकतो. मेहंदी लावताना थेट सूर्यप्रकाशात बसणे टाळा कारण यामुळे मेहंदी लवकर सुकते आणि सूर्यप्रकाशामुळे मेहंदीचा रंग फिका पडेल. मेंदी काढल्यानंतर हात पाण्यापासून दूर ठेवा. हाताला रंग देऊन कोरडी मेंदी काढा किंवा यासाठी बटर नाइफची मदत घ्या.


मेंदीचा रंग गडद करण्यासाठी हे घरगुती उपाय करा

साखर आणि लिंबू द्रावण

मेंदीचा रंग गडद करण्यासाठी साखर आणि लिंबाचा द्रावण तयार करा. मेंदी सुकल्यानंतर हे हातांना लावा. ही पेस्ट मेहंदी चिकट झाल्यावर उतरू देत नाही.

मोहरीचे तेल

जेव्हा मेंदी सुकते तेव्हा ती काढण्यापूर्वी 30 मिनिटे त्यावर मोहरीचे तेल लावा. हे लावल्याने मेहंदी सहज निघेल आणि काळोखही होईल.


खोबरेल तेल

खोबरेल तेल हा सगळ्यात उत्तम असा पर्याय आहे. मेंदी काढून झाल्यानंतर म्हणजे ती पूर्णपणे वाळल्यानंतरच खोबरेल तेल लावायचे असते. म्हणजे ज्यावेळी मेंदी सुकून काळी पडते तेव्हा मेंदी पाणी न लावता हातावरुन चोळून काढून टाकावी.असे करताना थोडीशी मेंदी हातावर राहिली तरी देखील चालू शकेल. आता त्याच हातावर थोडेसे खोबरेल तेल घेऊन तुम्ही ते चांगले चोळा. असे केल्यामुळे मेंदी आणि खोबरेल तेलाची प्रक्रिया होते. मेंद गडद होण्यास त्यामुळे मदत मिळते. मेंदी रंगण्यासाठीचा हा सगळ्यात सोपा आणि साधा अस प्रयोग आहे. 

साखर पाणी

साखर पाणी हा पर्यायसुद्धा खूप जणांना माहीत असेल. पण हा उपाय मेंदी लावल्यानंतर अवघ्या काहीच तासांमध्ये करायचा असतो. आता तुम्हाला सगळ्यात आधी मेंदी लावल्यानंतर ती थोडीशी हातावर वाळली की एक चमचा साखर आणि त्यात दुप्पट पाणी घाला. साखर चांगली विरघळली की, त्यामध्ये कापूस भिजवून तो मेंदीवर फिरवा. मेंदीवर फिरवल्यामुळे मेंदीचा रंग येण्यापेक्षा मेंदी जास्त काळ हातावर टिकण्यासाठी याचा उपयोग होतो. साखर ही विरघळल्यानंतर चिकट होते. त्यामुळे मेंदी हातावर अगदी व्यवस्थित चिकटते.

लवंगेची वाफ

 ज्यांची मेंदी अजिबात रंगत नाही किंव ज्यांना मेंदीचा काळा कुळकुळीत असा रंग हवा असतो. त्यांनी मेंदी काढून टाकल्यानंतर तव्यावर काही लवंगेच्या कळ्या टाकून त्या चांगल्या गरम झाल्या की, त्याची वाफ घ्यावी. अशा लवंगची वाफ घेतल्यामुळे मेंदी लाल होण्यास मदत होते. लवंगची वाफ घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच मेंदी काळी होण्यास मदत मिळते. 


धन्यवाद. 

माहिती संकलन : दिव्या सुनील चव्हाण 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad