पाककृती : कुरडईची भाजी | Kurdaichi Bhaji Racipe in Marathi

आजकालच्या धावपळीच्या जीवनात सकाळी ऑफिस ला जाताना लवकरात लवकर काय बनवावे असा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो. अश्या वेळी रुचकर आणि पटकन करता येणारी कुरडईची भाजी कशी बनवायची ते पण शिकू या.



साहित्य :
  • ७-८ कुरडया
  • १ कांदा बारीक चिरून
  • तेल
  • लाल तिखट
  • जिरी, मोहरी
  • हळद
  • ४-५ कढीपत्ताची पाने
  • कोथींबीर
  • चवीनुसार मीठ

कृती :
  • भाजी करायच्या आधी अर्धा तास कुरडया पाण्यात भिजत ठेवाव्या. (कुरडया जास्त वेळ भिजवू नये.)
  • कढईमधे तेल गरम करून घ्यावे त्यात जिरी, मोहरी, हळद, कढीपत्ता,बारीक कांदा टाकून लालसर परतून घ्यावे.
  • कुरडयामधील पाणी काढून फोडणीमध्ये घालाव्यात.
  • मीठ घालून चांगले परतून घ्यावे. 
  • वरून कोथींबीर टाकावी. 
  • एक वाफ देऊन गॅस बंद करावा.


टिप : सकाळी गडबडीमध्ये डबा बनवायला उत्तम पर्याय आहे. भाजी थोडीशी तिखटच बनवावी.


धन्यवाद.

माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad