उन्हाळाच्या दिवसात दुपारी शरीराला थंडावा देणारे तसेच आरोग्यासाठी उत्तम असणारे कैरीचे पन्हे घरी कसे बनवायचे ते आपण बघू या.
साहित्य :
- ५-६ कैऱ्या
- ३ वाटी साखर बारीक करून
- १ चमचा मीठ
कृती :
- कैरीची साले काढून त्या फोडी करून त्या कुकरमध्ये उकडून घ्याव्यात.
- थंड झाल्यावर कैरीचा गर मिक्सरमध्ये वाटून बारीक करावा.
- त्यात बारीक केलेली साखर आवश्यक गोडीनुसार घालावी.
- एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते.
- पन्हे करताना थोड्या गरात थंड पाणी व थोडेसे मीठ घालावे.
- आवडीनुसार थोडासा बर्फ टाकावा.
टिप : उन्हाळ्यामध्ये दुपारी पिण्यासाठी चांगले आणि झटपट होईल असे पेय आहे. त्यामुळे शरीरास थंडावा मिळतो. कैरीच्या पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन क असल्यामुळे ते उन्हाळयात पिणे फायदेशीर ठरते.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट