पाककृती : उपवास स्पेशल : भगर ( वरईचा भात) | Varaicha Bhat Racipe in Marathi

उपवास म्हटलं कि काय करावे असा प्रश्न गृहिणींना पडतो. असाच पटकन तयार होणारा एक उपवास स्पेशल भगर ( वरईचा भात) घरी कसे बनवायचं ते आपण बघू या.


साहित्य :
  • २ कप भगर (वरई )
  • ३ कप गरम पाणी
  • तूप
  • चवीपुरते मिठ

कृती :
  • कढईमधे तूप गरम करून घ्यावे त्यात वरई तांदूळ घालून थोडावेळ परतावे.
  • तांदूळ थोडेसे लालसर झाल्यावर गरम पाणी घालावे. चवीनुसार मिठ घालावे. आणि गॅस कमी करून मंद आचेवर १५ मिनिटे तांदूळ शिजून द्यावा.
  • जर एकदम मऊसर भगर पाहिजे असेल तर अंदाजानुसार पाणी थोडे जास्त घालावे.

टिप : उपवासाच्या दिवशी पटकन होणार पदार्थ आहे. आणि चवीलाही छान लागतो. वरई चा भात शेंगदाण्याच्या तिखट आमटीसोबत खायला छान लागतो.

धन्यवाद. 

लेखिका: सौ. किर्ती प्रविण दांगट
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad