पाककृती : आरोग्यदायी मसाला ताक (मठ्ठा) | Mattha Racipe in Marathi

रोजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी फायदेशीर असणारा मठ्ठा म्हणजेच मसाला ताक घरी कसा बनवायचा ते आज आपण शिकूया.



साहित्य :

  • १ कप दही
  • १ कप पाणी
  • कोथिंबीर
  • चिरलेली पुदीना पाने
  • जिरे
  • किसलेले आले
  • चवीनुसार मिठ


कृती :

  • प्रथम दह्यात पाणी मिसळून मिक्सरवर फिरवून घ्यावे.
  • थोडेसे जिरे वाटून आणि किसलेले आले घुसळलेल्या ताकात घालावे.
  • बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेली पुदीना पाने मीठ घालून थोडीशी कुस्करून घ्यावी, म्हणजे मठ्ठा पिताना पाने तोंडात येणार नाही. हि कोथिंबीर व पुदिन्याची पाने मठ्ठ्यात घालावी.
  • सर्व एकत्र मिसळून घ्यावे.
  • तिखटपणा हवा असेल तर थोडीशी मिरचीची पेस्ट करून घालावी.


आरोग्यासाठी फायदे :

मठ्ठामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.
ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या कधीच येत नाही. अधिक जेवन झाल्यास ताक पिल्याणे मोठा फायदा होतो.
ताकमध्ये विटामिन सी, ए, ई, के आणि बी असतं. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होतं.
ताकमध्ये काली मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने एसिडिटी बरी होते.

धन्यवाद.

लेखिका: सौ. किर्ती प्रविण दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad