आपण जुन्नर ला आलात किंवा आपल्या जुन्नरकर (जुंदरी) असलेल्या प्रियजनांच्या घरी गेलात आणि जुन्नरची स्पेशल शेंगोळी खाल्ली नाही असा कधीच होणार नाही. हिच जुन्नरची ओळख असलेली जुन्नर स्पेशल शेंगोळी घरी कशी बनवायची ते आज आपण शिकूया.
साहित्य :
कृती:
शेंगोळ्यांसाठी:
फोडणीसाठी:
शेंगोळी शिजल्यावर गरम भाकरी आणि कांद्यासोबत खावी.
टिप : थंडी किंवा पावसाच्या दिवसात खाण्यासाठी अगदी आरोग्यदायी आणि चविष्ठ असा पदार्थ आहे.
जुन्नर तालुक्यात आल्यावर शेंगोळीचा आस्वाद जरूर घ्यावा.
धन्यवाद.
लेखिका: सौ. किर्ती प्रविण दांगट
साहित्य :
- १ वाटी हुलग्याचं पीठ
- ओवा
- जिरे, मोहरी, हिंग
- ५-६ पाकळ्या लसूण ठेचून
- २ चमचे लाल तिखट
- तेल
कृती:
शेंगोळ्यांसाठी:
- प्रथम हुलग्याचं पीठ, ओवा, तिखट, मीठ , ठेचलेला लसूण सर्व एकत्र करून भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे.
- पीठ अर्धा तास भिजल्यावर गोल आकारात शेंगोळे बनवून घ्यावेत (कडबोळी सारखे ).थोडेसे पीठ उकळीमध्ये सोडायला ठेवावे.
फोडणीसाठी:
- कढईत फोडणीसाठी तेल घालून त्यामध्ये जिरे, मोहरी , हिंग , ठेचलेला लसूण घालून घ्यावे. लसूण छान परतून घ्यावा. उरलेल्या पिठात १ कप पाणी घालून मिक्स करून घ्यावे. फोडणीमध्ये १ कप मिस केलेल्या पिठाचे पाणी आणि ३ कप साधे पाणी घालून उकळी आणावी.
- कडक उकळी आल्यावर हळूहळू शेंगोळी उकळीमध्ये सोडावी. आणि १० ते १५ मिनिटे माध्यम आचेवर शिजवावे. गरजेनुसार मीठ घालावे.
शेंगोळी शिजल्यावर गरम भाकरी आणि कांद्यासोबत खावी.
टिप : थंडी किंवा पावसाच्या दिवसात खाण्यासाठी अगदी आरोग्यदायी आणि चविष्ठ असा पदार्थ आहे.
जुन्नर तालुक्यात आल्यावर शेंगोळीचा आस्वाद जरूर घ्यावा.
धन्यवाद.
लेखिका: सौ. किर्ती प्रविण दांगट