जगातील सर्वात लोकप्रिय असलेलं आणि सर्वात जास्त वापरकर्ते असलेलं मोबाईल ऍप पैकी एक म्हणजेच व्हॉट्सअप होय. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा जिव्हाळाच्या विषय बनलेल्या व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नव नवीन अपडेट घेऊन येत असते. त्यामुळे व्हॉट्सअप मधील कधी कधी घाई गडबडीत म्हणा किंवा चुकून आपल्याकडून महत्त्वाचे मेसेज डिलीट होतात आणि आपण निराश होऊन जातो. आपण गोंधळून जातो, डिलीट झालेले मेसेज परत कसे मिळवायचे हा प्रश्न पडतो. तेच डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे.
व्हॉट्सअप मेसेज रिकव्हर करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
१) जर तुम्हाला डिलीट झालेले व्हॉट्सअप मेसेज पुन्हा मिळवायचे असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला व्हॉट्सअप चॅट चा बॅकअप गूगल ड्राइव्हमध्ये घेणे गरजेचा आहे. व्हॉट्सअप चॅट डिलिट झाले असतील आणि तो रिकव्हर करण्याच्या या मधल्या वेळात तुम्हाला कोणताही मोबाईल अपडेट इन्स्टॉल करायचा नाहीये. नाही तर अपडेट दरम्यान तुमचा व्हॉट्सअप चॅट चा बॅकअप डिलिट होण्याची शक्यता असते. त्यामुळे हि पहिली पायरी लक्ष्यात ठेवा.
२) व्हॉट्सअप चॅट चा बॅकअप घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या मोबाईल मधून व्हॉट्सअप अनइंस्टॉल करायचं आहे.
३) त्यानंतर पुन्हा गूगल प्ले-स्टोर वरून पुन्हा व्हॉट्सअप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
४) या नंतर आपल्या जुन्या व्हॉट्सअप नंबर नेच पुन्हा व्हॉट्सअपवर सेटअप करायचा आहे.
५) शेवटी व्हॉट्सअप तुम्हाला बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी ऑप्शन दाखवेल.
६) तेव्हा रिस्टोअर ऑप्शनवर क्लिक करून सर्व मेसेज रिस्टोअर करून घ्यावे.
७) रिस्टोअर पूर्ण झाल्यावर आपण डिलिट झालेले मेसेज चॅट वर जाऊन बघू शकता
८) हे महत्त्वाचे मेसेज लगेच वाचण्यासाठी तुम्ही त्या मेसेजेसना स्टार मार्क करू शकता.
टिप: सध्या तरी डिलिट झालेले मेसेज रिकव्हर करण्याची पद्धत फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे. जर तुम्ही निरीक्षण केले असेल तर तुमच्या लक्ष्यात येईल कि जर आपल्या मोबाईलचं नेट चालू असेल तर व्हॉट्सअप दररोज मध्यरात्री २ वाजता आपल्या व्हॉट्सअप चॅट चा बॅकअप आपल्या मोबाईलच्या लोकल स्टोरेज मध्ये स्टोर करत असतो. तुम्ही या लोकल स्टोरेज चा हि डिलिट झालेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी वापर करू शकता.
धन्यवाद.
लेखक: कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक