किल्ले चावंड (प्रसन्नगड), ता. जुन्नर जि. पुणे | Chawand Fort Junnar Tourism in Marathi

चावंड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे . जुन्नर तालुक्यातून कुकडी नदी वाहते म्हणून जुन्नरला आधि कुकडनेर/जीर्णनगर असेही म्हणायचे. चावंड चा किल्ला हि याच कुकडी नदी च्या उगमाजवळ आहे.


नाव - चावंड
उंची - ३४०५ फूट
प्रकार  -गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी  - मध्यम
ठिकाण  - जुन्नर तालुका,पुणे जिल्हा.
जवळचे गाव  - चावंड

इतिहास :

नाणेघाट या प्राचीन व्यापारी घाट मार्ग चे पहारेकरी म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे.पुढे शहाजी राजांच्या वतनदारीत १६३७ पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता; नंतर तो मोगलांकडे गेला.(आदिलशाह आणि मोगलांपासून निजामशाहीचा बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला). राजारामाच्या काळात तो पुन्हा मोगलांकडे गेला. पेशवाईत मात्र तो मराठ्यांकडे होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.


गडाची माहिती :

चावंड किल्ला तसा अडवाटेवरचा. पण याच्या भटकंतीची मजा काही वेगळीच आहे .चावंड तसा मध्यम आकाराचा पण दुरून रौद्र वाटणारा किल्ला.तिनही बाजूंनी सरळसोट कडे आनि पश्चिम दिशेने घळीसदृश्य चढाईचा मार्ग आहे. एका बाजूला संरक्षणासाठी लोखंडी रेलिंग असून त्याची मदत घेऊनच आपल्याला पुढे जावं लागतं . अंदाजे १६० पायऱ्यांची हि चढाई हा एक वेगळाच थरारक अनुभव आहे. हि चढाई झाल्यावर लगेचच एक कातळदरवाजा आपला स्वागत करतो . दरवाज्याच्या कमानीवर मध्यस्थानी सुबक अशी गणेशमूर्ती कोरलेली असून तिचे त्या काळातील कोरीव काम खूप वाखाणण्याजोगे आहे . पावसाळी ऋतू मध्ये आपण भेट देऊ शकला तर ,माथ्यावर गवताचं हिरवं रान आणि सोबतीला विविधरंगी रानफुलं आपल्या स्वागताला तयार असतात .उजव्या बाजूला आयाताकृती पण कातळपायऱ्यांची विहीर मात्र सहज दिसली सहज आपला लक्ष्य वेधून घेते ,विहिरीच्या काठावर जीर्ण मंदिर असून, पूर्वेला सुबक अशी कातळ कलाकुसर आहे .

जवळच्याच बालेकिल्ल्याकडे जाऊन आपण एका जुन्या मंदिराचं जीर्णोध्दार झालेलं नवं रुप आणि विखुरलेल्या बांधीव शिळा इथे पाहू शकतो . इतर प्राचीन वास्तू मात्र आता फक्त अवशेष स्वरूपातच पाहायला मिळतात . गडाच्या माथ्यावरून समोरचा परिसर मोठा विस्तृत आणि भव्यदिव्य असा दिसतो .

किल्ल्याच्या उत्तर बाजूला कातळ टाक्यांचा सप्तसमुह असून भल्या मोठ्या विशाल खडकावर एकमेकात गुंफलेल्या आहेत .या कातळ टाक्या पाण्याने तुडुंब भरल्या असतात.

अशा या ऐतिहासिक गडावर भटकंती केल्यावर वेध लागतात ते सह्याद्रीच्या पुढचा किल्ला सर करायचे .

मार्ग :

चावंडला जाण्यासाठी प्रथम तालुक्याचं जुन्नर शहर गाठावं. तिथून आपटाळे-घाटघर रस्त्यावर १५ किमीवरील चावंडवाडी फाट्यापर्यंत यावं. स्वत:ची गाडी असेल तर उत्तम अन्यथा जुन्नरहून बस व खाजगी गाड्या सोईने उपलब्ध आहेत.

टीप : या ट्रेकचं नियोजन करताना शिवनेरी, हडसर ,नाणेघाट, जीवधन किल्ल्यासह माळशेज घाट देखील बघावेत. सोबतीला लेण्याद्री व ओझर हे अष्टविनायकातील दोन गणपती पाहता येतील.

अधिक छायाचित्रे





किल्ले चावंड (प्रसन्नगड) ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे.

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे , नाशिक

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ



धन्यवाद.

लेखक : श्री. प्रविण गोविंद दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad