म्युच्युअल फंड व्यवहारांच्या वेळांमध्ये (कट-ऑफ टायमिंग) बदल का करण्यात आले आहेत? | Mutual Fund in Marathi

भारतीय रिजर्व बँक ने दि ०७ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचना परीपत्रकानुसार सिक्युरीटी ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडीया SEBI ने म्युच्युअल फंड व्यवहारांच्या वेळांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनामुळे जागतिक पातळीवर शेयर मार्केट मध्ये खूप जास्त चढउतार होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.


सर्वात प्रथम कट-ऑफ टायमिंग कशाला म्हणतात ते बघू या.

मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड चे सदस्यत्त्व (Subscription) आणि विमोचन (Redemption) व्यवहारासाठी एक ठराविक वेळ देण्यात आली आहे त्यालाच कट-ऑफ टायमिंग म्हणतात.

शेयर मार्केट आणि NAV च्या किंमतीत दररोज चढउतार होत असल्याने या नियमामुळे दिलेल्या वेळेत व्यवहार करताना जर वेळ चुकली तर जे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांना कमी फटका बसणार आहे परंतू मोठ्या गुंतवणूकदारांसाठी खूप मोठा फटका बसणार आहे. कसं ते बघू या.

सदस्यत्त्व (Subscription) :
या मध्ये जे म्युच्युअल फंड Liquid and Overnight मध्ये येतात त्या साठी १२.३० pm ची वेळ देण्यात आली आहे आणि इतर म्युच्युअल फंड साठी १.०० pm ची वेळ देण्यात आली आहे.
म्हणजेच Liquid and Overnight च्या फंड चे व्यवहार (पेमेंट आणि दस्तऐवजीकरण) तुम्ही जर १२.३० pm च्या आत पुर्ण केले तर तुम्हाला आदल्या दिवशी NAV ची जी किंमत असेल त्या किंमतीत NAV चे वाटप होईल. जर तुम्ही व्यवहार (पेमेंट आणि दस्तऐवजीकरण) १२.३० pm नंतर पुर्ण केले तर दुसर्या दिवशी NAV ची जी किंमत असेल त्या किंमतीत NAV चे वाटप होईल. इतर म्युच्यूयल फंड साठी १.०० pm ची वेळ दिली आहे.

आता विमोचन Redemption करताना काय फरक पडेल ते जाणून घेऊया

विमोचन (Redemption) :
या मध्ये जे म्युच्युअल फंड Liquid and Overnight तसेच Others मध्ये येतात त्या साठी १.०० pm ची वेळ देण्यात आली आहे.
म्हणजेच Liquid and Overnight तसेच Others म्युच्युअल फंड चे व्यवहार (दस्तऐवजीकरण) तुम्ही जर १.०० pm च्या आत पुर्ण केले तर तुम्हाला आदल्या दिवशी NAV ची जी किंमत असेल त्या किंमतीत व्यवहार पुर्ण होऊन पेमेंट देण्यात येईल. जर तुम्ही व्यवहार (दस्तऐवजीकरण) १.०० pm नंतर पुर्ण केले तर दुसर्या दिवशी NAV ची जी किंमत असेल त्या किंमतीत व्यवहार पुर्ण होऊन पेमेंट देण्यात येईल.

शेयर मार्केट मद्ये रोज चढउतार होत असल्याने NAV च्या किंमतीत रोज बदल होत असतो. त्यामुळे वर नमुद केल्याप्रमाणे मोठ्या गुंतवणूकदारांसाठी निश्चितच मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे.



टिप : आपण मेहनतीने कमावलेला पैसा आपल्यासाठी खुप मोलाचा आहे. त्यामुळे हा पैसा शेयर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता आणि शेयर मार्केट आणि म्युच्युअल  फंड बद्दल स्वतः विश्लेषण करणे आणि माहिती घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपणास यातून मिळणारे रिटर्न्स, भविष्यात होणारा नफा आणि तोटा यांचं गणित समजण्यास मदत होईल. या साठी आपण शेयर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील तज्ञांची मदत घेऊ शकता. 

धन्यवाद. 

लेखक: कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad