मुच्युअल फंड : गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय??? | Mutual Fund Investment in Marathi

शेयर बाजार म्हटलं कि लोकं सहसा नाकं मुरडतात. काही लोक शेयर बाजाराकडे कुत्सीत नजरेनं बघतात. पण तुम्ही जर जगातील सर्वात यशस्वी लोकं, मोठे उद्योजग बघितले तर प्रत्येकाची शेयर बाजारात काही प्रमाणात गुंतवणूक आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरेन बफेट हे नाव तुम्ही ऐकलेले असेलच. वॉरेन बफेट यांनी त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेयर बाजारात गुंतवणूकनीस सुरवात केली. आज मितीला ते ६० हून अधिक कंपन्यांचे मालक आहेत. त्यामुले आपल्या वाक्यात आले असेलच कि जर आपली आर्थिक प्रगती साधायची असेल तर शेयर बाजार किंवा त्या समान मध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

शेयर बाजार खूप संवेदनशील असल्यामुळे तिथे थोडी रिस्क जास्त असते, म्हणून लोक सहसा गुंतवणूक करण्यास घाबरतात. अश्या लोकांसाठी शेयर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मुच्युअल फंड हा खूप छान पर्याय आहे. चला तर मग बघूया मुच्युअल फंड म्हणजे नक्की काय आहे.


मुच्युअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. या फंडाचे मॅनेजमेंट करण्यासाठी एक आर्थिक तज्ज्ञ / सल्लागार यांची नेमणूक करण्यात येते. त्यानं ना फंड मॅनेजर म्हणतात. फंड मॅनेजर गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात व तो विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात. फंडाची स्थापना करताना त्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले असते त्यानुसार प्रत्येक युनिटमध्ये गुंतवणूकदारांची समान मालकी असते.

अधिक वाचा : म्युच्युअल फंड व्यवहारांच्या वेळांमध्ये (कट-ऑफ टायमिंग) बदल का करण्यात आले आहेत?

मुच्युअल फंडांचे प्रकार :

प्रत्येक मुच्युअल फंडाचे गुंतवणुकीचे एक पुर्वनिश्चित असे उद्दिष्ट असते. ज्यात त्या फंडाचे पैसे कुठल्या प्रकारच्या प्रकारात व कशा योजनांनी गुंतविले जाणार हे ठरले असते. मुच्युअल फंडाचे खालील प्रकार आहेत.

इक्विटी फंड ( Equity Fund) :

 या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भुत असते व म्हणूनच अशा योजनेत शक्यतो एसआयपी (सिस्टिमँटीक इन्व्हेस्टमेंट प्लान) व्दारे नियमीत दिर्घकाळासाठी गुंतवणूक करावी. दिर्घकाळ म्हणजे किमान ५ वर्षे ते २० वर्षे नियमीत गुंतवणूक केली असता रुपी कॉस्ट अँव्हरेजींग व चक्रवाढीचा फायदा मिळतो व आकर्षक उत्पन्न प्राप्त होते. या प्रकारात .

  • लार्ज कॅप : या प्रकारच्या फंड मधून मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केली जाते.
  • स्मॉल कॅप: या प्रकारच्या फंडमधून स्मॉल कंपनी मध्ये इनव्हेस्टमेंट केली जाते.
  • मिडकॅप: या प्रकारच्या फंडस मधून मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केली जाते.
  • मल्टी कँप: मोठ्या,मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते
  • बँलन्सड: कंपन्याच्या शेअर्समध्ये व कर्जरोख्यात गुंतवणूक करुन समतोल राखला जातो.

खुले फंड( Open Ended ) :
  • अशा फंडांची कोणतीही परिपक्वता तारीख नसते.
  • खरेदी किंवा विक्री मूल्य हे नेहमी म्युचुअल फंडाच्या एकूण मालमत्ता किंमतीवर आधारित असते.

ठराविक काळात बंद होणारे फंड ( Close Ended ) :
  • हे फंड विशिष्ट कालावधीसाठीच चालतात.
  • गुंतवणूकदार, याचे युनिट शेअर बाजारातील चढाव – उतारानुसार विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात.

रोखेबंध फंड (Bond Fund) :
  • एक स्थिर उत्पन्न देण्याचा प्रयत्न या प्रकारात होतो.
  • जरी फंडाची किंमत वाढली तरी, ह्याचे मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना स्थिर पैसा पुरवणे हेच आहे.

समतोल फंड (Balanced Fund) :
  • सुरक्षा, उत्पन्न व भांडवलात वाढ असा समतोल या तिघांच्याही संयुक्ताने यात सांभाळता येतो. योजना हीच असते कि, निश्चित उत्पन्न देणारे विकल्प व शेअर्स यात संयुक्तपणे गुंतवणूक करणे.

रोखे/ शेअर : 
  • फंडगुंतवणूक ही शेअर व रोख्यांमधे असते.
  • म्युचुअल फंडाच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करतो.

 डेब्ट फंड योजना (कर्जरोखे आधारीत): 
  • डेब्ट आणि लिक्विड फंड मध्ये जनरली सिक्युरिटीज (bonds ,short term money market, commodities such as metal ) मध्ये इन्वेस्ट केली जातात.  
  • या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसल्यामुळे यातील काही योजनेत अत्यल्प काळासाठी गुंतवणूक करता येते. 
  • सर्वसाधारणपणे अशा योजनेतून मिळणारा परतावा हा तेवढ्याच कालावधीच्या बँक ठेवींपेंक्षा जास्त मिळण्याचीच शक्यता असते.


टिप : आपण मेहनतीने कमावलेला पैसा आपल्यासाठी खुप मोलाचा आहे. त्यामुळे हा पैसा शेयर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता आणि शेयर मार्केट आणि म्युच्युअल  फंड बद्दल स्वतः विश्लेषण करणे आणि माहिती घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपणास यातून मिळणारे रिटर्न्स, भविष्यात होणारा नफा आणि तोटा यांचं गणित समजण्यास मदत होईल. या साठी आपण शेयर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील तज्ञांची मदत घेऊ शकता. 

धन्यवाद. 

लेखक: कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad