!! श्री बल्लाळेश्वर गणपती प्रसन्न !!
स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम || बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा.
शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-
- पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
- दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
- तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
- चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
- पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
- सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
- सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
- आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती
अशा या अष्टविनायक यात्रेतील तिसऱ्या पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपती ची माहिती आपण बघूया.
पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. कल्याण नावाच्या व्यापा-याचा बल्लाळ हा सुपुत्र. लहानपणापासून त्याची श्री गणेशावर श्रद्धा होती. बल्लाळाने गणेशाची आराधना केली. त्याची भक्ती बघून श्री गणेश त्यास प्रसन्न झाले आणि त्याच्या इच्छानुसार पाषाणरूपी मूर्तीत येथेच राहिले.बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचे मंदिर आहे.ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केल्या जाते.
मंदिर आणि परिसर :
बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे.मंदिर पूर्वाभिमुख आहे. एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे.सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात.गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत.ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फुट उंच आहे.मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून आवारात मोठी घंटा आणि सभामंडप आहे . मंदिरा पुढील गाभा-यात दोन पायात मोदक धरून बसलेल्या उंदीराची मूर्ती आहे.
बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.
स्थान : तिर्थक्षेत्र पाली, ता. सुधागड, जि. रायगड
जवळची ठिकाणे :
अंतर :

- उन्हेरे-गरम पाण्याचे झरे (पालीपासून तीन किमी)
- उध्दर-रामाने जटायूचा उद्धार केला ते ठिकाण (पालीपासून चार किमी)
- सिद्धेश्वर-शंकराचे स्वयंभू मंदिर(पालीपासून तीन किमी)
अंतर :
- पाली-खोपोली:३८ कि.मी
- पुणे-खोपोली:११५ कि.मी.
- मुंबई- सुधागड: ११० कि.मी.
अधिक माहिती साठी श्री बल्लाळेश्वर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
http://www.ballaleshwar.com
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.
धन्यवाद.
माहिती संकलन : श्री.प्रविण गोविंद दांगट