अष्टविनायक : श्री सिद्धिविनायक गणपती तिर्थक्षेत्र सिद्धटेक ता. कर्जत जि. अहमदनगर | Ashtavinayak Siddhivinayak Ganpati in Marathi

                                           
!! श्री सिद्धिविनायक गणपती प्रसन्न !!

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट आणि ‘विनायक या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे.अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत.

स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम || बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम || लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |

या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा.

शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-
  • पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
  • दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
  • तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
  • चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
  • पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
  • सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
  • सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
  • आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

अशा या अष्टविनायक यात्रेतील दुसऱ्या सिद्धटेकच्या श्री सिद्धेश्वर गणपती ची माहिती आपण बघूया.

दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर : 


सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे.या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते.

मंदिर आणि परिसर :

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे.भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे.हे मंदिर उत्तराभिमुख आहे.महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे.मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे.मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे.गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. गणपतीच्या मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत.गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत.भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे.

स्थान : तिर्थक्षेत्र सिद्धटेक ता. कर्जत जि. अहमदनगर

जवळची ठिकाणे :
  • राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर.
  • पेडगांव येथील प्राचीन मंदिरे.
  • भिगवण येथील पक्षी अभयारण्य.
  • रेहेकुरी येथील अभयारण्य.
अंतर :
  • पुणे-दौंड-सिद्धटेक ११५ कि.मी.
  • पुणे-भिगवण-सिद्धटेक १४५ कि.मी.
  • मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर.

अधिक माहिती साठी श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्ट च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. 
http://www.siddhivinayak.org

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.





धन्यवाद. 

माहिती संकलन : श्री.प्रविण गोविंद दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad