अक्षय तृतीया हा सण वैशाख शुध्द तृतियेला साजरा केला जातो.भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले की ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही’ म्हणून या सणाला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात. या दिवशी केलेल देवपूजेमुळे घराण्यातील अनेक दोष नष्ट होतात.
अक्षय तृतीयेचे व्रत कसे करावे ?
खाली दिलेल्या मंत्राने जप करावा
अक्षय तृतीयेचे व्रत कसे करावे ?
- व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठावे
- घराची स्वच्छता व नेहमीची कामे उरकून शुद्ध पाण्याने आंघोळ करावी.
- घरातच एखादी पवित्र जागा शुवून पुसून घ्यावी. त्यावर पाट मांडून भगवान विष्णूंची प्रतिमा ठेवावी.
- बाजूने रांगोळी काढावी. आणि फुले वाहावीत.
खाली दिलेल्या मंत्राने जप करावा
ममाखिलपापक्षयपूर्वक सकल शुभ फल प्राप्तयेभगवत्प्रीतिकामनया देवत्रयपूजनमहं करिष्ये।
- जप करून भगवान विष्णूला पंचामृताने अंघोळ घालावी.
- विधीनुसार विष्णूची पूजा करावी.
- भगवान विष्णूला सुगंधित फुलांची माळ घालावी.
- नवैद्यात जवस किंवा गव्हाचे सातू, काकडी आणि हरबर्याची डाळ द्यावी.
- जमत असेल तर विष्णू सहस्रनामाचा जप करावा.
- शेवटी तुळशीला पाणी देऊन भक्तिभावाने आरती करावी.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट