मराठी संस्कृती : मराठी सण : गुडीपाडवा | Gudipadva in Marathi

आपल्या मराठी नविन वर्षाची सुरुवात ज्या सणापासून होते तो म्हणजे आपला गुडीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा प्रथम दिवस होय.

हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून रावणाचा पराभव करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस ‘चैत्र शुध्द प्रतिपदा’ हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया, तोरणे उभारून रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. दरवाजासमोर उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

 या दिवसाची सुरुवात कडुलिंबाची पाने खाण्याने करण्याची पद्धत आहे. कडुनिंबाच्या झाडाला या सुमारास नवीन पालवी फुटायला सुरवात होते त्याची कोवळी पाने काढून त्यात गूळासोबत खाण्याची पध्दत आहे. कडुलिंब हा आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार अत्यंत आरोग्यकारक व कीटकनाशक आहे .म्हणून हे आरोग्यास चांगले आहे.



गुढी उभारण्यासाठी काठी स्वच्छ धुवून,त्याला हळदकुंकवाची बोटे उठवतात. त्या काठीच्या एका टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या किंवा गडवा ठेवला जातो. गुढी उभारायची जागा स्वच्छ करून धुवून  त्यावर रांगोळी काढतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती लावतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. ही उभारलेली गुढी सायंकाळी चार वाजल्यानंतर गुळ खोबरे ठेवून प्रसाद ठेवून खाली उतरवतात.



धन्यवाद.

माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad