भाज्यांमधील बहुतेक जणांची सर्वात आवडती भाजी म्हणजेच भेंडी. भेंडी मध्ये विविध प्रकारे पदार्थ बनवता येतात. यातीलच सर्वांचा आवडता भेंडी मसाला घरी कसा बनवायचा ते आपण बघूया.
साहित्य :
अर्धा किलो भेंडी
२ कांदे
१ टोमॅटो
तिखट
हळद
जिरे-मोहरी
हिंग पावडर
गरम मसाला
आमचूर
धना पावडर
४-५ कढीपत्ता पाने
सजावटीसाठी कोथिंबीर
चवीपुरते मीठ
कृती :
- प्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. कोरडी करून मध्ये चिरून घ्यावी. खूप मोठं असेल तर दोन तुकडे करून घ्यावे.
- कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे, त्यात भेंडी तळून घ्यावी.
- त्या तेलामध्ये थोडे जिरे मोहरी, हळद, हिंग पावडर, कढीपत्ता घालून कांदे व टोमॅटो चिरून घालावे आणि चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावं.
- मसाल्याला तेल सुटायला लागल्यावर त्यात भेंडी, आमचूर,धना पावडर,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे.
- १० मिनटे झाकण ठेवून एक वाफ घ्यावी.भेंडी शिजल्यावर वरून कोथींबीर घालून सजवावे.
टिप : वाफ काढताना गरज वाटल्यास, भेंडीच्या बाजून एखादा चमचा तेल सोडावे.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट.