नवरात्र ,मार्गशीर्ष आणि श्रावण महिना आला कि अनेक स्त्रियांना उपवास असतो. अशावेळी काय खावे हा प्रश्न सगळ्याच गृहिणींना पडतो. यासाठीच उपवासाला बनवू शकाल असा उपवासाचा बटाटावडा घरी कसा बनवायचा ते आपण बघूया.
साहित्य :
- उकडलेले बटाटे
- १ कच्चा बटाटा किसून
- हिरव्या मिरच्या
- आले
- मीठ चवीनुसार
- शेंगदाण्याचा कूट
- खवलेला ओला नारळ
- लिंबाचा रस
वड्याच्या कव्हरसाठी :
- शिंगाडा पीठ
- राजगिरा पीठ
कृती :
- बटाटे सोलून त्याचा बारीक लगदा करून घ्या.
- हिरव्या मिरच्या आणि आले मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
- बटाट्यामध्ये आले मिरची पेस्ट,दाण्याचा कूट, खवलेला ओला नारळ घाला. लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
- आता या मिश्रणाचे तळहातावर घेऊन चपटे वडे करून घ्या.
- एका पातेल्यात शिंगाडा पीठ व राजगिरा पीठ एकत्र करून पाणी घाला, त्यामध्ये थोडे मक्थ किसलेला बटाटा,तिखट घाला.
- कढईमधे तेल गरम करून घ्या व एक छोटा चमचा तेल पिठामध्ये टाका म्हणजे वडे कुरकुरीत होतील.
- तयार केलेले वडे पिठात घोळवून तेलात सोडा.
टिप :
- गरमागरम वडे खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत खायला छान लागतात.
- तेल तापल्यावर त्यामध्ये थोडेसे मीठ घाला म्हणजे वडे जास्त तेलकट होणार नाहीत.
धन्यवाद
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट.