डोसा हा दक्षिण भारतातील आहाराचा एक भाग आहे, परंतु आता हि डिश संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय आहे. सांबार आणि चटणीबरोबर डोसा गरम सर्व्ह केला जातो. यातीलच सर्वांचा आवडता रवा डोसा घरी कसा बनवायचा ते आपण बघूया.
साहित्य :
- १ वाटी उडीद डाळ
- २.५ वाट्या बारीक रवा
- ७-८ मेथी दाणे
- मीठ चवीनुसार
कृती :
- डोसे करायच्या आधी एक दिवस सकाळी उडीद डाळ आणि मेथी दाणे धुवून भिजत घालायचे . रात्री मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं.
- हे बारीक केलेलं मिश्रण एका पातेल्यात काढून त्यामध्ये रवा घालून मिसळून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
- हे मिश्रण व्यवस्थित भिजवून झाकून रात्रभर उबदार जागी आंबवायला ठेवावे.
- पिठात गरजेनुसार पाणी आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून ढवळून घ्यावे.
- नॉनस्टिकचा तवा गरम करून त्यावर तेल फिरवून डोसे काढावेत.
टिप :
- ओल्या नारळाच्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या हिरव्या चटणी सबत खायला छान लागतात.
- सांबर आणि बटाट्याची डोसा भाजी सोबत देखील छान लागतो.
फायदे :
- उडीद डाळ आणि मेथी दाणे या गोष्टी आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात.
- डोसामध्ये कर्बोदकांमधे जास्त प्रमाणात असते
- त्यामुळे हा एकदम सोप्पं आणि पौष्टिक नाश्ता बनतो. जरूर करून पहा.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट