ढोकळा हा भारतातील गुजरातमधील एक पदार्थ आहे. हा पदार्थ बेसन पीठ आणि ताक या मिश्रणापासून बनवला जातो. ढोकळा सकाळी नाश्त्याच्या वेळी उत्तम पर्याय आहे. ढोकळ्याला खमण असे देखील बोलले जाते.
साहित्य :
कृती :
टिप : टोमॅटो सॉस किंवा चिंचेची चटणी सोबत खायला छान लागतो.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट.
साहित्य :
- २ वाटी बेसन पीठ
- १ चमचा लिंबूचा रस
- १ चमचा साखर
- १ चमचा रवा
- हळद
- जिरे-मोहरी
- कोथींबीर
- खोबरे किसून
- कढीपत्ता
- तेल
- ताक
- मीठ चवीनुसार
कृती :
- प्रथम बेसन पिठामध्ये आवश्यकतेनुसार ताक लिंबू रस घालून मिसळून घ्यावे. त्यात रवा , मीठ साखर,तेल घालून मिक्स करावे.
- वरील मिश्रणामध्ये रेगुलर इनो चे अर्धे पॅकेट घालावे. म्हणजे ढोकळा चांगला फुगतो.
- एका कुकरच्या डब्याला तळाला तेल लावून घ्यावे. त्यात हे मिश्रण घालावे. कुकरची शिट्टी काढून २० मिनिट शिजून द्यावं.
- ढोकळा थंड झाल्यावर चोकोनी वड्या कराव्या आणि त्यावर जिरी-मोहरी,हिंग,कढीपत्ता ,कोथींबीर, हिरवी मिरची ची फोडणी ओतावी. फोडणी मध्ये थोडे साखरेचे पाणी घालावे.
- खोबरे आणि कोथींबीर घालून सजवावे.
टिप : टोमॅटो सॉस किंवा चिंचेची चटणी सोबत खायला छान लागतो.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट.