भारतीय खाद्यसंस्कृतीत बिर्याणीला एक असाधारण महत्त्व आहे. बिर्याणीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. बिर्याणी मध्ये व्हेज - नॉन व्हेज मध्ये खूप काही विविधता आहे. त्यातील एक म्हणजे व्हेज बिर्याणी. हि चवदार व्हेज बिर्याणी घरी कशी बनवायची ते आज आपण पाहूया.
साहित्य:-
- बासमती तांदूळ २ वाटी
- कांदे २
- लसूण १ चमचा किसून
- पुदिना पाने
- हिरव्या मिरच्या
- कोथींबीर १ वाटी चिरून
- फ्लॉवर
- वाटाणा
- पनीर
- गाजर
- हळद
- लालतिखट
- लवंग ५-६
- तमालपत्र
- वेलदोडा
- जिरं
- केशर
- तूप २ चमचे
- लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
कृती :
- बिर्याणी करताना तांदूळ अर्धा तास आधी धुवून ठेवावा.
- कांदा उभा बारीक चिरून घ्यावा. कढईमधे तेल गरम करून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावा.
- फ्लॉवर तुकडे करून घ्यावेत. त्यात गाजर वाटाणा घालून धुवून घ्यावे.
- पनीरचे आवडीनुसार काप करून घ्यावेत.
- कढई मध्ये गरम तेलात सर्व भाज्या घालून त्यात आले लसूण पेस्ट, हळद,तिखट,मीठ,वेलदोडे,दालचिनीतूकडे घाला.
- त्यात बारीक चिरून हिरवी मिरची, लिंबाचा रस, कोथींबीर,पुदिना,तळलेला कांदा नीट एकत्र करून ३० मिनिटे मॅरीनेट करा.
- एका पातेल्यात तांदळाच्या दुप्पटपाणी घेऊन त्यात जिरे, लवंग, तमालपत्र घालून तांदूळ शिजत ठेवा.
- तांदूळ थोडा कच्चा असतानाच त्यातले पाणी काढून घ्यावे.
- एका मोठ्या पातेल्यामध्ये मॅरीनेट केलेले मिश्रण पसरवा. त्यावर भात घालून वरून २ चमचे तूप घाला. वरून कोथींबीर आणि केशर घालून १० मिनिटे संथ आचेवर शिजवून घ्या.
टिप : कांदा -कोथींबीर रायत्यासोबत गरम गरम बिर्याणी छान लागते. बिर्याणी सोबत ताक किंवा मठ्ठा असेल तर अधिकच उत्तम बेत होतो.
धन्यवाद
माहिती संकलन : सौ. किर्ती प्रविण दांगट.