डोंगरदर्यांनी वेढलेल्या, निसर्गसौन्दर्याची उधळण करत असलेल्या जुन्नर तालुक्यात ५ धरणे आहेत. चिल्लेवाडी पाचघर हे त्यातीलच एक होय. कुकडी, मीना, मांडवी आणि पुष्पावती या जुन्नर तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यातीलच मांडवी या नदीवर चिल्हेवाडी पाचघर हे धरण बांधले आहे.
डोंगरदर्यांनी वेढलेल्या या धरणावर पावसाळ्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.या धरणाचा परिसर अतिशय शांत आणि निवांत आहे. जुन्नर तालुक्यातील ५ धरणांपैकी हे सर्वात छोटे धरण आहे. पावसाळ्यामध्ये डोंगरदऱ्यामधून कडेकपारींमधून पाणी खाली आल्यावर या धरणाला येऊन मिळते.
चिल्हेवाडी धरणाच्या आजूबाजूला मनुष्यवस्ती खूप कमी प्रमाणात दिसून येते. तसेच तेथे हिरवीगार शेती पाहून मन रमून जाते. उंचावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पाहून मन हरवून जाते.
चिल्हेवाडी धरणाची उंची 62.56 आहे तर लांबी 440 आहे आणि एकूण संचयन क्षमता 27,170.00 आहे. पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमींना चिल्हेवाडी धरण म्हणजे एक पर्वणीच आहे. अशा या शांत आणि नयनरम्य परिसराला एकदा अवश्य भेट देऊन पहा.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट