संपादकीय : विशेष लेख : MPSC निकाल २०१९ : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा | Junnar MPSC Result 2019 in Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार अश्या विविध ४२० राजपत्रित अधिकारी जागांसाठी हि परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ या कालावधी दरम्यान घेण्यात आली होती.

तब्बल ३,६०,९९० विद्यार्थी पूर्व परीक्षेस बसले होते. त्यातले जवळपास ६,८२५ विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरले आणि त्यातील १,३२६ विद्यार्थी मुलाखती साठी पात्र ठरले होते. यातील अंतिम ४२० विद्यार्थ्यांची विविध राजपत्रित अधिकारी जागांसाठी जागांसाठी निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक शहरातील, तालुक्यातील लहान खेडेगावातील आपल्या मित्र - मैत्रिणींनी आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर घवघवीत असे यश संपादन केले आहे. निकाल जाहीर होताच विविध सोशल मीडिया वर येणाऱ्या प्रतिक्रिया, पोस्ट आणि फोटोमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या आई बाबा, भावंडांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला एक वेगळाच आनंद देऊन जात होता.

या निकालात आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील मित्र - मैत्रिणींनी आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर घवघवीत उज्ज्वल यश संपादन करून आपल्या घराचं, आई वडिलांचं, जुन्नर तालुक्याचं आणि जुन्नरकरांचं नाव मोठं करून शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.






आपली निवड झाल्याबाबद्दल आम्हा जुन्नरकरांच्या वतीने आपले मनापासून हार्दिक अभिनंदन. आपण घेतलेली मेहनत, जिद्द , चिकाटी, अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन खरंच वाखण्यासारखे आहे आणि यामुळेच आपल्याला या उज्ज्वल यशाला गवसणी घालता आली याचे आम्हास कौतुक आहे. तुमच्या या यशात तुमच्या कुटुंबांनी, तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांनी, मित्र - मैत्रिणींनीही मोलाचे सहकार्य केले त्यांचेही मनापासून खूप अभिनंदन आणि त्यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

आपल्या उत्तुंग यशाने आम्हा जुन्नरकरांचा नक्कीच अभिमान उंचावला आहे आणि आपण शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आपण घेतलेल्या मेहनतीचा आणि आपल्या यशाचा आदर्श घेऊन आपल्या जुन्नर तालुक्यातील विद्यार्थी भविष्यात आपल्यासारखेच उत्तुंग यश प्राप्त करतील यात आम्हाला काही शंका नाही.

आपण आपल्या कामातून आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आणि आम्हा जुन्नरकरांचे नाव असेच उंचावत राहो. आपल्या वाटचालीस "आम्ही जुन्नरकर" टीम तर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.

धन्यवाद.

आपलाच,
कु.हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक  
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad