ऊन्हाळा सुरू झाला कि उन्हापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी फक्त थंड पाणी आणि थंड शितपेय यावरच अवलंबन राहणे आरोग्यास चांगले नाही. घरी बनवलेले थंडगार पेय आपल्या आरोग्यास उत्तमच यामुळे आपली प्रतिकार शक्ती देखील वाढते. यामुळे आपले शरीर डिहाइड्रेशन सारख्या समस्यांचा सामना अगदी सहजपणे करू शकते. बाहेरील शीतपेयापेक्षा घरी बनवलेले पेय आरोग्यास उत्तम चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने हे थंडगार पेय आपण घरच्याघरी तयार करू शकतो.
पुदिना सरबत
पुदिन्याच सरबत हे ऊन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहाइड्रेशन पासुन वाचवते.
सरबत बनवताना सर्वात प्रथम मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने, साखर,काळ मीठ,मिरपूड,मध आणि जीरा पावडर घालून चांगले बारीक वाटुन घ्या. या तयार झालेल्या मिश्रणाला थंड पाण्यात मिक्स करुन घ्यावे. पुदिना पेय आस्वाद घेण्यास तयार आहे.
फायदे :

- पुदीन्याला अँटीऑक्सीडंट आणि व्हिटॅमीन A चा उच्च स्त्रोत समजलं जात.ज्याचा वापर डोळ्यांचा प्रकाश आणि नाईट व्हिजनसारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो. पुदीन्यात आढळणाऱ्या अँटीऑक्सीडंट्स आपल्या शरीराची तणावापासून मुक्तता करण्यात मदत करता.
- पचन सुलभ होते.
- कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी
- कफ आणि सर्दीवर गुणकारी
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट