पाककृती : उपवास स्पेशल : उपवासाची इडली | Upvas Idali Racipe in Marathi

उपवास म्हटलं कि सर्वांच्या आवडत्या साबुदाण्याच्या खिचडीचा बेत हा ठरलेलाच असतो. साबुदाणा मध्ये हि विविध प्रकारचे पदार्थ आपल्याला बनवता येतात. असाच एक पदार्थ  उपवासाची इडली कशी बनवायची ते आपण आज शिकूया.



साहित्य :
  • साबुदाणे
  • भगर
  • मीठ
  • सोडा
  • दही/ ताक
  •  तेल
कृती :
  • सर्वप्रथम साबुदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. जास्त बारीक करायची गरज नाही रव्यासारखे झाले तरी चालेल.
  • भगर मिक्सरला थोडी बारीक करून घ्यावी
  • आता दोन्ही मिश्रण एका पातेल्यात घेऊन त्यात थोडे दही टाकावे. दही नसल्यास ताक वापरले तरी चालेल.
  • या पिठामध्ये मीठ आणि सोडा घालून ३०-४० मिनिटे भिजायला ठेवावं.
  • इडलीच्या प्लेट्सला तेल लावून त्यात हे मिश्रण घालावे आणि १५ मिनिटे शिजवून घ्यावे.
  • शेंगदाण्याच्या आमटीसोबत खायला द्यावे.

टिप :
  • इडली बनवताना त्यामध्ये थोडे मिश्रण टाकून त्यात उपवासाची बटाटा भाजी वरून परत थोडे मिश्रण घातले तरी छान चवदार इडली बनते.
  • इडलीसोबत दही देखील खायला छान लागते.


धन्यवाद.

रेसिपी आभार : सौ. किर्ती प्रविण दांगट

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad